"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १४:
 
==कवठी चाफा==
कवठी चाफ्याचा छोटा वृक्ष असतो. कवठ पिकल्यावर जसा गोडसर वास येतो तसाच वास या चाफ्याच्या फुलाला येतो. त्यावरूनच याचे नाव कवठी चाफा असे पडले असावे. Magnolia pumila हे शास्त्रीय नाव असलेला कवठी चाफा हासुद्धा उत्तर अमेरिकेतील आहे; परंतु भारतातही हिमालय आणि निलगिरी पर्वतरांगा अशा थंड प्रदेशात आढळतो. फूल हिरवट पांढरे आणि गोलाकार असते. फुलात मॅग्निलिया हे सुवासिक तेल असते. कवठी चाफ्याचे पांढरे शुभ्र फूल रात्रीतिन्हीसांजेला उमलते आणि; सकाळपर्यंत याच्या पाकळ्या गळून जातात.
 
कवठी चाफ्या पोटजाती पुष्कळ असल्या तरी त्यांतील भेद मामुली आहेत .असे असले तरी एक महापुष्प कवठी चाफा असतो. त्याला भरपूर आणि मोठमोठी फुले येतात. ती पाहिल्यावर झाडावर बगळेच बसले आहेत असा भास होतो..
 
==नागचाफा==
Line २१ ⟶ २३:
==हिरवा चाफा==
हिरवा चाफा (शास्त्रीय नाव Artabotrys odoratissamus) ही एक सुवासिक फुले देणारी वेली आहे. चढण्यास आधार मिळाला नाही तरे हा वेल आपसात पकडी घेऊन एखाद्या झुडपासारखा गोळा होऊन राहतो. वेलाच्या फुलाच्या डेखाआधी एक आकडी असते. तिने आधार पडून वेल वर चढते. हिरव्या चाफ्याची पाने दाट हिरवी., गुळ्गुळीत व चकवकीत असतात. पानांच्या बगलात चार सेंटिमीटर लांबीची सुवासिक हिरवीगार फुले येतात, ती जोडीची किंवा एकेकटी असतात. दाट हिरव्या पालवीत लपलेले छोटे फूल त्याच्या हिरव्या रंगामुळे एका नजरेत सहसा दिसत नाही.
 
हिरव्या चाफ्याची फुले साधारणपणे पावसाळ्यात येतात.
 
बाळ फुलाला वास येत नाही. ज्या दिवशी फूल तयार होते, त्यादिवशी ह्याचा सुगंध परिसरात दरवळायला लागतो. हिरव्या चाफ्याचा सुगंध फूल पिकून पिवळे झाल्यावर जास्तच दरवळतो. ह्याच्या सुगंधामुळे साप ह्या झाडाखाली येतात असे म्हणतात. हिरव्या चाफ्याचा सुगंध दडत नाही.
Line २६ ⟶ ३०:
चीन आणि जावा या देशांत हिरवा चाफा विपुल प्रमाणात आढळतो.
 
हिरव्या चाफ्याच्या झाडाला फळेही हिरवीगार लागतात. लंबगोलाकार टोकाला निमुळती असलेल्या या फळांचे घड लागतात. त्याच्या बीपासून रोप तयार करता येते.
 
==तांबडा चाफा==
ह्या झाडाला इंग्रजीत रेड फ्लँगिपनी म्हणतात. शास्त्रीय नाव Plumeria rubra. सात आठ मीटर उंचीच्या या वृक्षाला गुलाबी, पांढर्‍या आणि पिवळ्या रंगांची छटा असलेली सुगंधी फुले येतात. फुले उन्हाळ्यात किंवा हिवाळ्याच्या आरंभी येतात.
 
==भुईचाफा==.
भुईचाफा (शास्त्रीय नाव Caferia rotundo) हे थेट जमिनीतून उगवणारे थोडेफार दुर्मीळ फूल आहे. पावसाळ्यात बहरणारी ही हिरवीगार रोपे हिवाळ्यात पुरती वाळून जातात नि उन्हाळ्यात उगवतात. गर्द जांभळ्या रंगाची संदले (मोठ्या पाकळ्या) आणि त्यातून वर आलेल्या निळसर पांढर्‍या पाकळ्या हे या फुलाचे वर्णन.
 
===अन्य नावे===
* कानडी - नेल संपिगे
* गुजराथी - भुईचंपो
* शास्त्रीय नाव - .केंफेरिया रोटुंडा
* संस्कृत - भूमिचंपा, भूचंपक
* हिंदी- भुई चंपा
 
भुईचाफा ही आकर्षक, सुगंधी फुले देणारी व अनेक वर्षे जगणारी भीसरपट पसरणारी वनस्पती मलायात व भारतात सर्वत्र आढळते आणि शोभेकरिता बागेत सर्वत्र लावतात. हिला जमिनीखाली असणारे आयताकृती गाठीसारखे खोड असून जाडसर शाखांपासून जमिनीत अनेक गड्डे बनतात. पाने दोन वा क्वचित अधिक, साधी, आखूड व पन्हळी देठाची, लांबट, मोठी (३० ते ४५ संटिमीटर बाय ७ ते ११ सेंटिमीटर आकारमानाची), उभी, अंडाकृती भाल्यासारखी असून त्यांचा वरचा पृष्ठभाग हिरवट व चित्रविचित्र आकृतिबंधाचा आणि खालचा पृष्ठभाग लालसर जांभळा असतो झाडाला बोंडे येतात. दोन आवरणांच्या बोंडात अनेक बिया असतात
 
 
 
==भुईचाफा==.
 
(अपूर्ण)
"https://mr.wikipedia.org/wiki/चाफा" पासून हुडकले