"बर्नार्ड कॅझनूव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

फ्रान्सचे ९९ वे पंतप्रधान
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: बर्नार्ड कॅझनूव (जन्म : २ जून, इ.स. १९६३) हे ६-१२-२०१६ रोजी फ्रान्सचे...
(काही फरक नाही)

१८:२९, ११ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती

बर्नार्ड कॅझनूव (जन्म : २ जून, इ.स. १९६३) हे ६-१२-२०१६ रोजी फ्रान्सचे पंतप्रधान झाले. फ्रान्सचे याआधीचे पंतप्रधान मॅन्युअल वॉल्स यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी अंतर्गत सुरक्षा मंत्री असलेले बर्नार्ड कॅझनूव यांची नियुक्ती झाली. मे २०१७मध्ये निवडणुका होईपर्यंत ते पंतप्रधानपदावर राहतील.

बर्नार्ड कॅझनूव हे व्यवसायाने वकील आहेत. इ.स. १९९७ पासून ते खासदार असून त्यापूर्वी ते चेरबर्गचे महापौर होते.

बर्नार्ड कॅझनूव यांची डिसेंबर २०१६पर्यंतची राजकीय कारकीर्द

  • सुरुवातीला चेरबर्ग शहराचे महापौर
  • १९९७मध्ये खासदार
  • ऐरॉ यांच्या मंत्रिमंडळात युरोपीय देशांतील प्रकरणे हाताळणार्‍या खात्याचे मंत्रिपद (सन २०१२)
  • अर्थखात्याचे राज्यमंत्रिपद (मार्च २०१३)
  • मॅन्युअल वॉल्स यांच्या मंत्रिमंडळात अंतर्गत सुरक्षा मंत्री-गृहमंत्री
  • पंतप्रधानपद (सन २०१६)