"सेतुमाधव पगडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
}}
'''सेतुमाधवराव पगडी''' ([[ऑगस्ट २७]], [[इ.स. १९१०|१९१०]] - [[ऑक्टोबर १४]], [[इ.स. १९९४|१९९४]]) हे [[इतिहास]][[संशोधक]], विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि ’गॅझेटियर्स’चे संपादक व [[लेखक]] होते. त्यांनी यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली. [[शिवाजी]] महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक [[नॅशनल बुक ट्रस्ट]] या [[नवी दिल्ली|नवी दिल्लीतील]] प्रकाशनाने [[मराठी भाषा|मराठी भाषेत]] प्रसिद्ध केले आहे.
 
इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, त्यांनी विपुल प्रमाणात स्फुट व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणले.
 
मुंबईत वास्तव्यास असताना पगडी यांनी तेरा वर्षांत किमान तेराशे गंथ अभ्यासले. त्यांच्याकडे आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह धरला गेला तेव्हा त्यांनी विविध भाषेतील किमान शंभर आत्मचरित्रे वाचून काढली. इंग्रजी, मराठी, उर्दू, फारसी, बंगाली, अरबी, तेलुगू, कन्नड अशा जवळपास सतरा भाषा त्यांना अवगत होत्या. राष्ट्रपती डॉ. राजेंदप्रसाद औरंगाबादेत आले तेव्हा पगडींनी एक तास अस्खलित उर्दूमधून सूफी संप्रदायावर भाषण दिले. ते राष्ट्रपतींना इतके आवडले की, त्यांनी ‘अ मोस्ट लनेर्ड पर्सन’ या शब्दात पगडी यांची प्रशस्ती केली. “मराठवाडा साहित्य परिषद“ , “इंदूर साहित्य सभा“, “मराठी वाड्मय परिषद“ आदी संंस्थांचे अध्यक्षपद सेतुमाधवराव पगडींनी भूषविले आहे.
 
सेतु माधवराव पगडी हे इ.स. १९६० ते इ.स. १९६९पर्यंत महाराष्ट्राच्या गॅझेटिअर विभागाचे सचिव होते. इ.स. १९५१ साली [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्याचे]] कलेक्टर म्हणून त्यांनी काम केले होते. त्यापूर्वी ते [[हैदराबाद संस्थान]]मध्ये सनदी अधिकारी होते.
Line ५२ ⟶ ५६:
|}
 
==सन्मान आणि पुरस्कार==
* मराठवाडा विद्यापीठाने डॉक्टरेट ही मानाची पदवी
* पगडी यांच्या “जीवनसेतु“, “छत्रपती शिवाजी“ या त्यांच्या ग्रंथाना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार
* मराठा मंदिर संस्थेकडून चरित्रकार पदक
* [[मसाप]]कडून न. चिं. केळकर पारितोषिक
* भारत सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार.
 
 
Line ५९ ⟶ ६९:
[[वर्ग:मराठी लेखक|पगडी,सेतुमाधवराव]]
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक|पगडी,सेतुमाधवराव]]
[[वर्ग:पद्मभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती]]
[[वर्ग:इ.स. १९१० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९४ मधील मृत्यू]]