"धनादेश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
धनादेश म्हणजे एका व्यक्तीने किंवा संस्थेने दुसऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला रक्कम अदा करण्यासाठी बँकेला दिलेला लेखी आदेश.
 
हा धनादेश फक्त बॅंकेमार्फतच वटवून त्याचे पैसे करता येतात. धनादेश विशिष्ट प्रकारच्या आणि विशिष्ट आकारमानाच्या बँकेने पुरवलेल्या छापील नमुना-कागदावर लिहिला जातो.
 
==धनादेशाचा कागद==
* धनादेशासाठी वापरलेल्या कागदावर पुढेपुढच्या किंवा मागच्या बाजूला कार्बनचे मुक्त कण नसतात.
* वापरलेला कागद अतिनील किरणांसाठी निष्क्रिय असतो. म्हणजे तो अतिनील किरणांमध्ये धरला तर चमकत नाही.
* धनादेशासाठी वापरलेल्या कागदाला एमआयसीआर (मॅग्नेटिक इंक कॅरॅक्टर रेकग्निशन) कागद म्हणतात. हा कागद बहुधा ९५ जीएसएम वजनाचा बाँड पेपर असतो. म्हणजे धनादेशासाठीच्या वापरलेल्या एक चौरस मीटर कागदाचे वजन ९५ ग्रॅम असून तो करारनामा जसल्या कागदावर लिहून देतात तसल्या प्रकारचा असतो. काही बँका १०० जीएसएम कागद वापरतात.
* हा कागद अशा प्रकारचा असतो की त्यावर लिहिलेला मजकूर खोडरबराने, अॅसिडने, अल्कलीने, ब्लीचिंग एजंटने किंवा अन्य संद्रिय-असेंद्रिय रसायनाने पुसून बदलता येत नाही.
"https://mr.wikipedia.org/wiki/धनादेश" पासून हुडकले