"चित्रगुप्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
हे सुद्धा पहा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''चित्रगुप्त''' हा [[हिंदू]] पुराणे व आख्यायिकांनुसार लोकांच्या पाप-पुण्याचे हिशेब ठेवणारा देव आहे. मेल्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर चित्रगुप्ताच्या दरबारात हजर रहावे लागते. तेथे तो ते हिशोब माणसाला ऐकवतो.
 
चित्रगुप्ताच्या पहिल्या पत्नीचे नाव नंदिनी ऐरावती होते. ही सूर्यदेवतेची नात आणि श्रद्धदेव मुनीची कन्या होती. नंदिनीला चार पुत्र झाले. भानू, मतिमान, चारू आणि सुचारू. या चौघांपासून अनुक्रमे श्रीवास्तव, सक्सेना, माथुर आणि गौड या आडनावांचे कायस्थ वंश जन्माला आले.
 
चित्रगुप्ताची दुसरी पत्नी शोभावती किंवा दक्षिणा. ही सुशर्म ऋषीची मुलगी होती. तिला आठ मुले झाली. करुण, चित्रचारू, भानुप्रकाश, युगंधर, वीर्यवान, जितेंद्रिय, सदानंद आणि विश्वभानू. या आठ पुत्रांपासून अनुक्रमे कर्ण कायस्थ, निगम, भटनागर, अंबष्ठ, आस्थाना, कुलश्रेष्ठ, सूरध्वज, बाल्मीक या आडनावांचे कायस्थ वंश जन्माला आले.
 
चित्रगुप्त हा आद्य [[कायस्थ समाज|कायस्थ]] समजला जातो. [[भाऊबीज]]ेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते. तो दिवस चित्रगुप्ताची जयंती म्हणून साजरा होतो.
 
== भारतातातील चित्रगुप्ताची मंदिरे==
* अयॊध्या, उत्तर प्रदेश
* अलाहाबाद (अनेक देवळे)
* अल्वार, राजस्थान
* उज्जैन, मध्य प्रदेश
* उदयपूर राजस्थान
* कांचीपुरम, तमिळनाडू
* कोरबा, छत्तीसगड
* खजुराहो, मध्य प्रदेश
* गोरखपूर, उत्तर प्रदेश
* जबलपूर, मध्य प्रदेश
* जयपूर, राजस्थान
* डाल्टनगंज, झारखंड
* भोपाळ मध्य प्रदेश
* मैनपुरी, उत्तर प्रदेश
* लखनौ, उत्तर प्रदेश
* वीरगंज, नेपाळ
* पाटणा; मुझपफ्फरपूर; राॅक्झाॅल; हाजीपीर (सर्व बिहार)
* हैदराबाद, तेलंगण
 
==अधिक माहिती==
[http://www.thehindu.com/2005/11/06/stories/2005110613670200.htmहैदाराबादमधील चित्रगुप्ताचे मंदिर]
 
==हे सुद्धा पहा==