"चित्रगुप्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
चित्रगुप्त हा लॊकांच्या पाप-पुण्याचे हिशेब ठेवणारा देव. मेल्यानंतर स्वर्गात गेल्यानंतर चित्रगुप्ताच्या दरबारात हजर रहावे लागते. तेथे तो ते हिशोब माणसाला ऐकवतो.
 
चित्रगुप्ताच्या पहिल्या पत्नीचे नाव नंदिनी ऐरावती. ही सूर्यदेवतेची नात होती. नंदिनीला चार पुत्र झाले. भानू, मतिमान, चारू आणि सुचारू. या चौघांपासून अनुक्रमे श्रीवास्तव, सक्सेना, माथुर आणि गौड या आडनावांचे कायस्थ वंश जन्माला आले.
 
चित्रगुप्ताची दुसरी पत्नी शोभावती. तिला आठ मुले झाली. करुण, चित्रचारू, भानुप्रकाश, युगंधर, वीर्यवान, जितेंद्रिय, सदानंद आणि विश्वभानू. या आठ पुत्रांपासून अनुक्रमे कर्ण कायस्थ, निगम, भटनागर, अंबष्ठ, आस्थाना, कुलश्रेष्ठ, सूरध्वज, बाल्मीक या आडनावांचे कायस्थ वंश जन्माला आले.
 
चित्रगुप्त हा आद्य [[कायस्थ समाज|कायस्थ]] समजला जातो. [[भाऊबीज]]ेच्या दिवशी चित्रगुप्ताची पूजा होते.