"देव दिवाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
या पानावरील सगळा मजकूर काढला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
देव दिवाळी ऊर्फ देवदीपावली हा सण महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात साजरा होतो. या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जाऊन पोहे खातात.
 
कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी. या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. चातुर्मास्य समाप्तीनंतर लग्नाचे मुहूर्त निघायला लागतात. सुरुवात तुळशीच्या लग्नाने होते. एकादशी ते पौर्णिमा या पाच दिवसांंपैकी कोणत्याही एका दिवशी घरांघरांतून उसाच्या दांडक्यांचे मंडप घालून त्यांत तुळस आणी बाळकृष्ण यांचे विवाह संपन्न होतात. भाऊबीजेनंतर थांबवलेली घरांबाहेरची रो़षणाई पुन्हा उजळते, पुन्हा पणत्या, आकाशकंदिल लागतात.
 
एकेकाळी पोर्तुगीजांचे राज्य असलेल्या दीवमध्ये तुळशीची लग्ने सार्वजनिकरीत्या आणि दणक्यात लागतात. दिवाळीत न उडवता जपून ठेवलेले फटाके या दिवशी संपवले जातात.
 
 
 
[[वर्ग:हिंदू सण]]