"अश्विनी एकबोटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अश्विनी एकबोटे (माहेरच्या अश्विनी काटकर, मृत्यू : २२ आॅक्टोबर, २०१६) या एक मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना होत्या.
 
बालवयातच त्यांनी ‘नंदनवन’ या नाटकात काम केले होते. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी संपादन करीत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी अभिनय केला होता.
 
==निधन==
सहज संस्थेतर्फे ‘नाटय़ त्रिविधा’ या कार्यक्रमाचा पुण्यतील भरत नाटय़ मंदिर येथे सायंकाळी शुभारंभाचा प्रयोग होता. या कार्यक्रमात अश्विनी एकबोटे यांनी काही गीतांवर नृत्य सादर केले होते. शेवटी त्या ‘संगीत बावनखणी’ नाटकाच्या भैरवीवर नृत्य करण्यासाठी रंगमंचावर आल्या. प्रसिद्ध गायिका रेवा नातू आणि चिन्मय जोगळेकर यांनी नाट्यगीत सादर केले. त्यावर नृत्य करीत असताना तिहाई घेतल्यावर अश्विनी रंगमंचावर कोसळल्या. त्यांना तातडीने पेरुगेटजवळील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच नऊच्या सुमारास त्यांचे निधन झाले. (२२-१०-२०१६). त्या फक्त ४४ वर्षांच्या होत्या.
 
==अश्विनी एकबोटे यांची भूमिका असलेलॆ चित्रपट-नाटके-दूरचित्रवाणी मालिका==
* आईसाहेब (मराठी चित्रवाणी मालिका)
* आरंभ (मराठी चित्रपट)
* एका क्षणात (मराठी नाटक)
* कशाला उद्याची बात (मराठी चित्रवाणी मालिका)
* [[डेबू]] (मराठी चित्रपट)
* तप्तपदी (मराठी चित्रपट)
* तू भेटशी नव्याने (मराठी चित्रपट)
* त्या तिघांची गोष्ट (मराठी नाटक)
* दणक्यावर दणका (मराठी चित्रपट, २०१३)
* संगीत बावनखणी (नाटक)
* बावरे हे प्रेम (मराठी चित्रपट)
* भोभो (मराठी चित्रपट)
* महागुरू (मराठी चित्रपट)
* राधा ही बावरी (मराठी चित्रवाणी मालिका)
* हायकमांड (मराठी चित्रपट)
* क्षण मोहाचा (मराठी चित्रपट)