"वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (मुंबई)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
{{कॉपीपेस्ट| |
No edit summary |
||
ओळ १:
'''वीर जिजाबाई भोसले उद्यान''' तथा '''राणीचा बाग''' ही [[मुंबई]]तील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव ''क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स'' होते. ही बाग [[भायखळा]] येथे असून ५३ एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे. या बागेचे उद्घाटन १९ नोव्हेंबर १८६२ रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी
राणीच्या बागेत झाडे, झुडपे, लता आणि शंभरी ओलांडलेले अनेक वृक्ष यांचा संचय असलेला अनमोल खजिना आहे. ही बाग म्हणजे २८६ प्रजातींच्या ३,२१३ वृक्षांचे आणि ८५३ वनस्पती जातींचे आश्रयस्थान आहे. याशिवाय अनेक सस्तन प्राणी, पक्षी आणि कीटक यांचे वास्तव्य या उद्यानात आहे. मुंबईतील इतर कुठल्याही उद्यानात इतके विस्मयकारक वनस्पती-वैविध्य सापडत नाही. येथील कित्येक वृक्षांनी शंभरी पार केलेली आहेत. तर काही इतके दुर्मीळ आहेत की मुंबईत अन्यत्र ते क्वचितच आढळतात. मुंबईतील महाविद्यालयांतील तसेच मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे वनस्पतिशास्त्राचे विद्यार्थी येथे अभ्यासासाठी आणि भेटीसाठी येतात. भारतातील सर्वात मोठय़ा वनस्पतिसंग्रहालयांपकी एक असलेल्या मुंबईतील ‘ब्लाटर हर्बेरिअम’मध्ये राणीच्या बागेतील वनस्पतींचे ४६५ नमुने जतन केलेले आहेत. या उद्यानाचा आणखी एक मानिबदू आहे तो म्हणजे हिरव्या रंगाच्या लाकडी पट्ट्यांच्या जाळीने बनलेली, पुरस्कारपात्र ठरलेली वनस्पती संरक्षिका (कॉन्झर्वेटरी) जी लंडनमध्ये ‘क्यू’ येथे असलेल्या ‘पाम हाऊस’च्या धर्तीवर उभारलेली आहे.
{{कॉपीपेस्ट|दुवा=http://www.loksatta.com/lokrang-news/new-upcomeing-books-273369/}}
तपशीलवार आणि निसंदिग्ध अभिलेख आणि दस्तऐवज यांवरून हे लक्षात येते की तत्कालीन [[
अतुलनीय वनस्पतिवैविध्याबरोबरच त्या काळी युरोपमध्ये लोकप्रिय असलेल्या ‘पुनरुज्जीवन’ या शैलीत उभारलेल्या या अनोख्या वनस्पती उद्यानातील तिहेरी कमान व लेडी फ्रेअर टेम्पल, तसेच ससून क्लॉक टॉवर ही वारसाशिल्पे राणीच्या बागेची शोभा द्विगुणित करतात.
==राणीच्या बागेवरील पुस्तके==
|