"शंकर बडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शंकर बडे ऊर्फ काका बडे (जन्म : बोरीअरब-दारव्हा तालुका, ३ मार्च, इ.स....
(काही फरक नाही)

२२:३३, १ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

शंकर बडे ऊर्फ काका बडे (जन्म : बोरीअरब-दारव्हा तालुका, ३ मार्च, इ.स. १९४७; मृत्यू : यवतमाळ, १ सप्टेंबर, इ.स. २०१६) हे एक विदर्भातील यवतमाळ येथे राहणारे मराठी कवी होते. आपल्या कवितांच्या माध्यमातून त्यांनी वर्‍हाडी बोलीभाषेचा प्रचार-प्रसार केला.

शंकर बडे हे वर्‍हाडी कविता आणि किस्स्यांचे कार्यक्रम करत. त्यांनी लघुकथाही लिहिल्या. एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून हास्याची कारंजी फुलविताना ते प्रेक्षकांना भावनांची तरलतेत आणि कारुण्य डोहात बुडवून काढत. त्‍यांनी वर्‍हाडी लोकजीवन महाराष्ट्रासमोर आणले. वर्‍हाडच्या ग्रामीण जीवनातील अस्सल अनुभव त्यांनी आपल्या बॅरिस्टर गुलब्या या एकपात्री प्रयोगातून साकारले. महाराष्ट्रात त्या एकपात्रीचे तीनशेवर प्रयोग झाले.

आकाशवाणी-दूरदर्शनसाठी आणि वृत्तपत्रांतून व दिवाळी अंकांतून त्यांनी पुष्कळ लेखन केले.

भाग्योदय कला मंडळाच्या शिवरंजनी आॅर्केस्ट्रात त्यांनी निवेदक म्हणून काम केले होते.

शंकर बडे यांच्या लोकांना आवडलेल्या काही कविता

  • आम्ही असे दिवाणे आम्हास नाव नाही आम्ही घरोघरी अन् आम्हास गाव नाही ...
  • पावसानं इचीबहीन कहरच केला नं नागो बुढा काल वाहूनच गेला

शंकर बडे यांचे कवितासंग्रह

  • अस्सा वर्‍हाडी माणूस
  • मुगूट

सन्मान

  • आर्णी येथे २१-२३ फेब्रुवारी २०१४ या काळात झालेल्या ६३व्या [विदर्भ साहित्य संमेलन|विदर्भ साहित्य संमलनाचे]] अध्यक्षपद


(अपूर्ण)