"सनई चौघडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
चौघडा आणि नौबत (नगारा) यांचा इतिहास थेट कौरव-पांडवांच्या युद्धापर्यंत जाऊन थडकतो. त्या काळात चौघडा आणि नौबत जेव्हा एकत्रित वाजत असत, तेव्हा त्याला 'दुंदुभी' म्हणत. सैनिकांना स्फुरण चढण्यासाठी युद्धाच्या प्रारंभी नौबत वाजवत, तर युद्धातील विजयानंतर दुंदुभी वाजवून विजयाची स्फूर्तिदायी वार्ता प्रजाजनांपर्यंत पोहोचवली जात असे.
 
==महाराष्ट्रातले गाजलेले सनईवादक==
* [[शंकरराव गायकवाड]] : [[नम्रता गायकवाड]] ही गायकवाडांच्या पाचव्या पिढीतली तरुण सनईवादक आहे.
 
==महाराष्ट्रातले गाजलेले चौघडावादक-पाचंगे==
महाराष्ट्रात अनेक चौघडेवाले चौघडा-वादनाचा उद्योग पिढीजात करीत आहेत. पिंपळ गावातील पाचंगे कुटुंबीय चार पिढ्या वाजंत्री-चौघडा वाजवित आहेत. साप्रंतचे वाजंत्रीवादक रमेश पाचंगे याचे आजोबा जयाजी पाचंगे यांनी ही परंपरा सुरू केली. त्यांना चौघडासम्राट ही पदवीही बहाल करण्यात आली होती. संपूर्ण भारतातून त्यांना चौघडा वादनासाठी पाचारण केले जात असे. ती परंपरा चालू ठेवणारे रमेश पाचंगे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वार्षिक समारंभात अप्रतिम चौघडा वादन करून वाहवा मिळविली होती. अभिनेते [[जॅकी श्रॉफ]] यांनी त्यांचे वादन ऐकले आणि शाबासकी देऊन, स्वतःच्या घरच्या मंगलप्रसंगी त्यांना निमंत्रण देऊन वादन करविले.
 
सनई, संबळ आणि सूर धरणारी पेटी या तिघांच्या एकत्रित वादनाला वाजंत्री म्हणतात. वाजंत्री-चौघडा वादनाची पिढीजात कला मुंबईत मुगभाटातील साळुंखे कुटुंबीयांनी राखली आहे. मुंबईतील मुगभाट, ठाकूरद्वार, दादरची खांडके चाळ येथे चौघडावादकांची दुकाने पूर्वी हारीने थाटलेली असत.
 
 
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सनई_चौघडा" पासून हुडकले