"पेठा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पेठा ही आग्र्‍याची एक सुप्रसिद्ध मिठाई आहे. याच शहरात या...
(काही फरक नाही)

००:१०, २५ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

पेठा ही आग्र्‍याची एक सुप्रसिद्ध मिठाई आहे. याच शहरात या पदार्थाची निर्मिती झाली. आग्र्‍याचा ताजमहाल जितका जगभरात प्रसिद्ध आहे तितकीच ही मिठाईदेखील या शहराच्या नावानेच ओळखली जाते.

पेठ्याच्या जन्माची १ली आख्यायिका

मुगलसम्राट शहाजहानने आपली बेगम मुमताज महलसाठी ताजमहालचे स्वप्न पाहिले तेव्हा ते साकारण्यासाठी हजारो मजूर त्या संगमरवरी स्वप्नावर काम करत होते. या मजुरांच्या रोजच्या आहारात डाळ, भात, रोटी सब्जीच असायची. ते खाऊन कंटाळलेल्या मजुरांनी तशी तक्रार केली. शहाजहानने त्याबद्दल एका पीराला आपली समस्या सांगितली. पीराने ध्यान लावले. समाधी अवस्थेत असताना त्याला पेठ्याची पाककृती गवसली. त्यानंतर जवळपास ५०० खानसाम्यांनी मजुरांसाठी पेठा बनवला.

पेठ्याच्या जन्माची २री आख्यायिका

शहाजहानने मुमताज महलसाठी पाहिलेले स्वप्न ताजमहालच्या रूपात प्रत्यक्षात साकारल्यानंतर त्याने त्या आनंदाप्रीत्यर्थ आपल्या खानसाम्यास अशी मिठाई बनवण्याचा आदेश दिला जी त्या संगमरवरी ताजमहालसारखीच शुभ्र, पवित्र असेल. त्यातून पेठ्याची निर्मिती झाली.

पेठ्याची पाककृती

साखरेचा पाक आणि कोहळा (म्हणजे हिंदीत पेठा) यांच्या मिश्रणातून ही पाककृती बनते. मुळात संगमरवरी दगडासारखी पांढरी शुभ्र असलेली ही गोडगट्ट मिठाई हल्ली केवड्याच्या वासाने सुगंधी केलेली आणि विविध रंगांनी रंगवून विकली जाते.

पंछी पेठा

लोणावळ्याला जशी मगनलाल चिक्की प्रसिद्ध आहे, तसाच आग्र्‍याला भारतीय प्रमाणन दाखला मिळालेला (ISO Certified) पंछी पेठा प्रसिद्ध आहे.