"जयंत सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
| तळटिपा =
}}
 
जयंत सावरकर हे एक मराठी नाट्य अभिनेते आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी, इ.स. १९५५पासून त्यांची आभिनयाची कारकीर्द सुरू झाली.
 
नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकातच काम करायचे ठरविले तेव्हा त्यांचे सासरे नटवर्य [[मामा पेंडसे]] यांनी नोकरी सोडण्याला विरोध केला पण अभिनयाच्या कामासाठी पूर्ण पाठिंबा दिला. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली.
 
सुरुवातीची बारा वर्षे सावरकर यांनी ‘बॅक स्टेज आर्टिस्ट’ म्हणून काम केले. त्याच वेळी ते नोकरीही करत होते. नाटकाची आवड होतीच. हौशी नाटय़संस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही काही काळ काम केले. पुढे साहित्य संघाच्या नाटय़ शाखेत त्यांचा प्रवेश झाला. साहित्य संघात होणाऱ्या सर्व नाटकांच्या प्रयोगांना त्यांची हजेरी असायची. आचार्य अत्रे लिखित आणि पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ‘किंग लिअर’ (सम्राट सिंह) या नाटकात त्यांना मा. दत्ताराम यांच्यासमवेत काम करण्याची संधी मिळाली. नाटक फारसे चालले नसले तरी त्यांनी साकारलेल्या ‘विदूषक’ या भूमिकेचे कौतुक झाले.
 
केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम, परशुराम सामंत, दादा साळवी, जयराम शिलेदार, पंडितराव नगरकर, सुरेश हळदणकर, भालचंद्र पेंढारकर, मा. अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर, बाळ कोल्हटकर, रामदास कामत, राजा परांजपे, रमेश देव ते आजच्या पिढीतील मंगेश कदम, अद्वैत दादरकर यांच्याबरोबर त्यांनी काम केले आहे.
 
==जयंत सावरकर यांन्ची भूमिका असलेली नाटक आणि त्यांतील भ्मिकेचे नाव==
* अपूर्णांक
* ओ वुमनिया
* के दिल अभी भरा नही
* तुझे आहे तुजपाशी
* दुरितांचे तिमिर जावो
* नयन तुझे जादुगार
* लहानपण देगा देवा
* वाजे पाऊल आपुले
* व्यक्ती आणि वल्ली
* सम्राट सिंह (विदूषक)
* सूर्यास्त
* सौजन्याची ऐशी तैशी
 
==जयंत सावरकर यांचे काम असलेले चित्रपट==
* बिस्कीट
* झांगडगुत्ता, वगैरे
 
==आत्मचरित्रात्मक पुस्तक==
* मी एक छोटा माणूस
 
==जयंत सावरकर यांना मिळाले पुरस्कार आणि सन्मान==
* रत्‍नागिरी जिल्ह्यातील ‘सर्वोत्कृशह्ट अभिनेता’ म्हणून गौरव (१९९६)
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते|सावरकर, जयंत]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|सावरकर, जयंत]]