"पुंडलिक वेर्णेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

मराठी नाट्य अभिनेते
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुंडलिक वेर्णेकर (जन्म : वेर्णे-गोवा, इ.स. १९१३; मृत्यू : महाड, १७ जान...
(काही फरक नाही)

१६:०७, २० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

पुंडलिक वेर्णेकर (जन्म : वेर्णे-गोवा, इ.स. १९१३; मृत्यू : महाड, १७ जानेवारी, इ.स. २०१५) या गोव्याच्या नाट्यकलावंताने १९२४ ते १९५३ अशी २९ वर्षे मराठी नाटकांतून स्त्री भूमिका केल्या. त्यानंतर ते पुरुष भूमिकाही करू लागले.

बालगंधर्वाच्या काळांमध्ये त्यांचे सहकारी म्हणून वेर्णेकरांनी अनेक नाटकांमध्ये कामे केली होती. महाडमधील एका प्रयोगात बालगंधर्वांच्या अनुपस्थितींत ती भूमिका पुंडलिक वेर्णेकर यांनी केली होती.

वेर्णेकर हे नृत्य करणारे त्या काळांतील पहिलेच रंगकर्मी कलाकार होते. गायक कलावंत म्हणूनही त्यांची ओळख होती. वेर्णेकरांच्या त्या काळांतील स्त्री भूमिका खूप गाजल्या होत्या. शाकुंतल, एकच प्याला, मानापमान, संगीत सौभद्र अशा अनेक नाटकांमध्ये ते प्रमुख भूमिका करीत.

बालगंधर्वाच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराच्या वादाच्यावेळी स्वतः पुढे येऊन वेर्णेकरांनी बालगंधर्वाच्या पार्थिवाला अग्नी दिला होता. ही आठवण कै. पुंडलिक यांच्या आयुष्यांतील मोठी शिदोरी होती असे ते नेहमी म्हणत असत.

मृत्युसमयी वेर्णेकर १०२ वर्षाचे होते.


पुंडलिक वेर्णेकर यांच्या काही भूमिका आणि नाटके

  • दयाल शेठ (नाटक - नवा खेळ)
  • माया एकवचनी (उधार उसनवार)
  • वीणा (प्रेमसंन्यास)