"अरुण होर्णेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: अरुण होर्णेकर हे एक मराठी नाट्य कलावंत आहेत. असे म्हणतात की अरुणस...
(काही फरक नाही)

००:२८, १८ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

अरुण होर्णेकर हे एक मराठी नाट्य कलावंत आहेत. असे म्हणतात की अरुणसारखी एका वेडाने झपाटून काम करणारी माणसे कलाक्षेत्रात आहेत म्हणूनच तर त्या क्षेत्राची स्वायत्तता टिकून आहे. व्यावहारिक लाभासाठी किंवा व्यावहारिक गरजा भागल्यावर आत्मतृप्तीसाठी कलाक्षेत्राकडे येणारे शंभरातले नव्याण्णव कलावंत आहेत, परंतु स्वतःची झोळी रिती असतानाही निरपेक्षपणे कलाक्षेत्रात सतत असणारा आणि तिथल्या मिळालेल्या क्षणांत आनंद शोधत स्वतःतच दंग राहणारा अरुण होर्णेकर सारखा एखादाच असतो.

३५हून अधिक वर्षे अरुण होर्णेकर नाट्यक्षेत्रात आहे. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये थिएटर ऑफ अॅब्सर्डच्या अचाट प्रयोगांपासून ते कालच्या ‘वेटिंग फॉर गोदो’ पर्यंत तो सतत काही ना काही करून बघत असतो. इतकी वर्षे या क्षेत्रात वावरूनही त्याच्यात बनचुकेपणा आलेला नाही, हे एक आश्चर्यच आहे. मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘अमृत नाट्य भारती’मध्ये त्याने पहिल्यांदा ‘गोदो’मधला लकी केला होता. त्यानंतर मागच्या वर्षी जुन्या ‘गोदो’तले त्याचे सहकारी अनंत पणशीकर यांनी पुन्हा बेकेटचे तेच अभिजात नाटक रंगभूमीवर आणले ते प्रायश: अरुणसाठी आणि या नाटकात काम करायला एका पायावर तयार झालेल्या टॉम ऑल्टरसाठी. टॉमनेही अरुणच्या दिग्दर्शनाखाली हे नाटक करताना खूप मोकळे वाटल्याचे सांगितले. दिग्दर्शक म्हणून अरुणचे हे वैशिष्ट्य आहे की, तो आपल्या कलाकारांना पूर्णपणे फुलू देतो आणि त्यांच्यातील सार्मथ्यस्थळांचा वापर करतो. तो स्वतः नट म्हणून फार मोठ्या समजल्या जाणार्‍या भूमिकांना सहज भिडला आहे. उदाहरणार्थ, खानोलकरांच्या ‘एक शून्य बाजीराव’मधली माधव वाटव्यांनी गाजवलेली प्रमुख भूमिका त्याने सहजी केली.

कुठल्याही भूमिकेत शिरून तिची मजा लुटणे, ही चांगल्या नटाची खूण त्याच्यात ठसठशीतपणे आहे. म्हणूनच ‘सख्खे शेजारी’ सारखा विनोदी रेव्ह्यू असो की ‘कुणी तरी आहे तिथं’ यासारखे रहस्यप्रधान नाटक, अरूणचे त्यातले असणे लक्षणीय ठरते. अन्य कोणताही कामधंदा न करता आणि नाटकात कामे मिळवण्याची अजिबात खटपट न करताही अरुण या क्षेत्रात खांबासारखा उभा आहे.

अरुण होर्णेकर यांचा अभिनय असलेली नाटके

  • एक शून्य बाजीराव
  • कुणी तरी आहे तिथं
  • वेटिंग फॉर गोदो
  • सख्खे शेजारी

पुरस्कार