"पुपुल जयकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुपुल जयकर (जन्म : इटावा-उत्तर प्रदेश, ११ सप्टेंबर, इ.स. १९१५, मृत्...
(काही फरक नाही)

२२:३९, ७ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

पुपुल जयकर (जन्म : इटावा-उत्तर प्रदेश, ११ सप्टेंबर, इ.स. १९१५, मृत्यू : मुंबई, २८ जून, इ.स. १९९७) या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या लेखिका होत्या.

पुपुल जयकर यांचे वडील सुरतचे विनायक एन. मेहता. ते अलाहाबाद येथे आय.सी.एस. अधिकारी होते. त्यामुळे पुपुल जयकर यांचे बरेचसे बालपण अलाहाबादमध्ये गेले. तेव्हाच त्यांचे नेहरू घराण्याशी संबंध जुळले. १९३० साली त्यांची इंदिरा गांधींशी परिचय झाला. नंतर १९५० साली मुंबईत भेट होऊन त्यांची गाढ मैत्री झाली ती इंदिरा गांधींच्या १९८४ सालच्या मृत्यूपर्यंत.

कारकीर्द

लंडन विद्यापीठातील बेडफर्ड महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यावर पुपुल जयकर यांनी टाइम्स ऑफिंडियाकडे नोकरीसाठी अर्ज केला.तेव्हा ‘आम्ही तुमचे लेख छापू, पण महिलांना आम्ही नोकरीमध्ये घेत नसतो’ असे त्यांनी कळवले. लंडनमध्ये असतानाच त्यांचे लग्न बॅरिस्टर मनमोहन मोटाभाई जयकर यांच्याशी झाले.

इ.स. १९४१ साली काँग्रेस पक्षात सामील झाल्यावर पुपुल जयकर यांचा रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, युसुफ मेहेर‍अली यांच्याशी स्नेह झाला.१९४८ साली जे. कृष्णमूर्तींची भेट]] झाली आणि पुपुल जयकर यांच्यावर कृष्णमूर्तींचा विलक्षण प्रभाव पडला.

==पुपुल जयकर भारतातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष होत्या आणि नंतर विश्वस्त. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान येथे झालेल्या भारतीय महोत्सवाच्या त्या मुख्य सूत्रधार होत्या. पुपुल जयकर पुढे त्या इंडियन नॅशनल ट्रस्ट .फॉर आर्ट अॅन्ड कल्चरल हेरिटेग (इन्टॅक) या संस्थेच्या अध्यक्ष झाल्या.

पुपुल जयकर यांची संस्थाकीय कामे

(अपूर्ण)