"आलाय मोठा शहाणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ‘आलाय मोठा शहाणा’ हे वैभव परब यांनी लिहिलेले आणि संतोष पवार यां...
(काही फरक नाही)

१६:१२, २ ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती

‘आलाय मोठा शहाणा’ हे वैभव परब यांनी लिहिलेले आणि संतोष पवार यांनी दिग्दर्शित केलेले एक मराठी नाटक आहे.

कथानक

दादासाहेब नावाच्या गावातील वजनदार असामीने आपल्या सिंड्रेला नामक एकुलत्या एक पण ढ मुलीला शिकवण्यासाठी आपल्या नोकराकरवी एका मास्तरला गोणत्यात घालून पकडून आणला आहे. आपल्या मुलीला काहीही करून एस.एस.सी. पास करायचेच असा पण दादासाहेबांनी केलेला असल्यामुळे आणि ती एस.एस.सी. झाल्याशिवाय तिचे गुलाबरावाशी लग्न लावून दिले जाणार नसल्यामुळे मास्तरवर मोठी आफत ओढवली आहे. हरप्रकारे सिंड्रेलाला शिकवण्याचा प्रयत्न करूनही ते वाया जातात तेव्हा मेटाकुटीला आलेला मास्तर शेवटी तिच्या डोक्यातल्या सिनेमावेडाचाच शिकवणुकीत वापर करतो आणि मिशन फत्ते करतो.