"मार्कंडा किल्ला" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
==इतिहास==
शहाजहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने सप्तशृंगीगड, मार्कंड्या, रवळ्याजावळ्या, धोडप हे सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख इंद्राई किल्ल्यावर पाहता येतो. वणी – दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. महाराजांच्या निधनानंतर मोगलांनी हे किल्ले परत जिंकले.
 
==कसे जावे?==
मार्कंड्या व रवळ्या–जावळ्या किल्ल्याच्या मध्ये जी खिंड आहे, तिला मुळणबारी या नावाने ओळखतात. या खिंडीतून मार्कंड्या गडाच्या दिशेने चढून गेले की पहिल्या टप्प्यावर एक पठार लागते. ही गडाची माची आहे.
 
माचीवरून बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर दगडात कोरलेल्या, बांधलेल्या पायर्‍या आहेत. या वाटेवरच डावीकडे एका कातळकड्याखाली कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. त्यांना ‘ध्यान गुंफा’ म्हणतात. येथून वर चढताना उजव्या हाताला बुरुजाचे व डाव्या हाताला तटबंदीचे अवशेष दिसतात. हा पायर्‍यांचा टप्पा संपला की समोर सप्तशृंगी गड दिसतो. त्यानंतर लागणार्‍या डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते.
==संदर्भ==