"प्रदीप मुळ्ये" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रदीप मुळ्ये हे मराठी नाट्यसृष्टीतले एक नामवंत नेपथ्यकार आहेत....
(काही फरक नाही)

०७:१०, २५ जुलै २०१६ ची आवृत्ती

प्रदीप मुळ्ये हे मराठी नाट्यसृष्टीतले एक नामवंत नेपथ्यकार आहेत. त्यांनी दीडशेहून अधिक नाटकांचे नेपथ्य केले आहे. नाटकाच्या श्रेय नामावलीत नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये याचे नाव आले की त्या नाटकाचे दृश्य मूल्य वाढते, असा नाट्यकर्मींचा अनुभव आहे.

जे.जे. स्कूल ऑफ आर्ट मधून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या मुळ्येंपाशी मुळातच सौंदर्यदृष्टी होती, परंतु द.ग. गोडसे, दामू केंकरे यांच्यासारख्या मोठ्या नेपथ्यकारांच्या सान्निध्यात राहून त्यांच्या मनात कलेची मूलतत्त्वेही रुजली आणि त्यांचा विकास त्यांनी स्वतःच्या कामातून करत नेला. नाट्यसृष्टीत प्रारंभीच्या काळातच त्यांची पं. सत्यदेव दुबेंसारख्या थोर नाट्यकर्मीशी गाठ पडावी, हा त्यांच्यासाठी मोठा भाग्ययोग ठरला. दुबेंनी दिग्दर्शित केलेल्या 'सावल्या', 'इसापचा गॉगल' या नाटकांचे अत्यंत वेगळे, नाविन्यपूर्ण नेपथ्य मुळ्येंनी केले.

प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि प्रकाशयोजना असलेली नाटके

  • इंदू काळे सरला भोळे
  • इसापचा गॉगल
  • दोन स्पेशल
  • प्रपोजल
  • राजा सिंह
  • वाडा चिरेबंदी
  • सारे प्रवासी घडीचे
  • सावल्या

पुरस्कार

  • कलागौरव पुरस्कार
  • कलादर्पण पुरस्कार
  • डॉ. श्रीराम लागू यांच्या रूपवेध संस्थेचा त्न्वीर नाट्यधर्मी पुरस्कार
  • भारतीय टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार
  • महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार
  • मराठी अचिव्हमेन्ट अन्ड अवॉर्ड (MAAI)
  • मराठी इंटरनॅशनल फ़िल्म अन्ड थिएटर अवॉर्ड (MIFTA)


(अपूर्ण)