"गुलाबराव महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३५:
गुलाबराव महाराज यांचा जन्म [[अमरावती ]] जिल्ह्यातील [[लोणी टाकळी]] येथे झाला. चार महिन्यांचे असतानाच त्यांना अंधत्व आले.
 
बालपणापासून ज्ञानेश्वरीचा व्यासंग होता. गुलाबराव महाराज जातीने कुणबी होते. "भगवद्देह अनध्यस्त-विवर्त आहे, म्हणजे ज्ञानानंतर नाश पावत नाही" हा भक्तिसिद्धान्त शांकरतत्त्वज्ञानाच्या आधारावर मांडून त्यांनी मधुराद्वैत दर्शनाचा पुरस्कार केला. सांख्य-योगादी षड्दर्शने परस्परविरोधी नसून पूरक आहेत, असे त्यांनी वेळोवेळी संगितले. "भारतातील नानाविध धार्मिक संप्रदाय हिंदू, बौद्ध, जैनादी भारतीय धर्म आणि ख्रिस्ती, मुसलमानादी सर्व अभारतीय धर्म, वैदिक धर्माच्याच एकेका अंशावर स्थित आहेत" असे विचार ते मांडत असत. डार्विनचा उत्क्रांतिवाद, स्पेन्सरचे तत्त्वज्ञान इ. पाश्चात्त्य विचारसरणी त्यांना मान्य नव्हती. [[शंकराचार्य]], [[ज्ञानेश्वर]], [[नामदेव]], [[एकनाथ]], [[तुकाराम]] व [[रामदास]] या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात केलेल्या ग्रंथनिर्मिती केली.
 
आर्य "वंश" असून तो बाहेरून भारतात आला, हे मॅक्स म्यूलर व लोकमान्य टिळकांचे मत त्यांना मान्य नव्हते. प्राचीन ग्रंथांतील गणित, रेडियम, ध्वनी, ईथर, इलेक्ट्रॉन्स, उष्णता-गति-प्रकाश, विमानविद्या, अणुविज्ञान वगैरेंचे अनेक मौलिक संदर्भ त्यांनी दाखविले. वेदान्त, उपनिषदे, आत्मज्ञान, प्राचीन संत साहित्य, ध्यान-योग-मधुराभक्ती, आयुर्वेद, डार्विन-स्पेन्सर आदी शास्त्रज्ञांचे सिद्धांतसिद्धान्त - हे त्यांच्या अभ्यासाचे, चिंतनाचे व लेखनाचे विषय होत. 'मधुराद्वैत' (मधुरा भक्ती व अद्वैत विचार यांचा समन्वय) हा नवा विचार त्यांनी भक्तांना दिला.
 
ते स्वतःला ''संत ज्ञानेश्वरांची कन्या'' मानत असत. कृष्णपत्‍नी मानून मंगळसूत्रादी स्त्रीचिन्हेही ते धारण करीत. महाराजांच्या नंतर त्यांचा संप्रदाय ''बाबाजी महाराज पंडित'' यांनी इ.स. १९६४ पर्यंत चालविला.
ओळ ४५:
== साहित्य ==
मराठी, हिंदी व संस्कृत भाषेवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. गुलाबराव महाराज यांनी काव्यशास्त्र, आयुर्वेद, संगीत इ. अनेक विषयांवर लेखन केले. संस्कृत, हिंदी, मराठी या भाषांतून व वर्‍हाडी बोलीतून त्यांनी १३३ ग्रंथ लिहिले. सूत्रग्रंथ, भाष्य, प्रकरण, निबंध, प्रश्नोत्तरे, पत्रे, आत्मचरित्र, आख्याने, नाटक, लोकगीते, स्तोत्रे, व्याकरण, कोश वगैरे वाङ्‌मयप्रकार त्यांनी हाताळले. २७,००० ओव्या, २,५०० अभंग, २,५०० पदे, ३,००० श्लोकादी रचना इत्यादींचा त्यांत समावेश आहे.
* अलौकिकव्याख्यानेअलौकिक व्याख्याने (इ.स. १९१२)
* धर्म समन्वय
* साधुबोध (इ.स. १९१५)
* प्रेमनिकुंज (इ.स. १९१८)
* संप्रदाय सुरतरु (इ.स. १९१९)
* योगप्रभाव
* संप्रदाय सुरतरु (इ.स. १९१९)
* धर्म समन्वय
* साधुबोध (इ.स. १९१५)
*
 
==गुलाबराव महाराज यांच्यावरील पुस्तके==
* प्रज्ञाचक्षू दीपस्तंभ (बाळ राणे)
* संत गुलाबराव महाराज (सुनीति आफळे)
* संत श्री गुलाबराव महाराज (प्रा. विजय यंगलवार)
* ज्ञानेश्वर कन्या-गुलाबराव महाराज (चरित्र, डॉ.सच्चिदानंद शेवडे)
 
 
 
 
{{विस्तार}}
{{मराठी साहित्यिक}}