"तुळसी परब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: तुळसी परब (जन्म : ; मृत्यू : ४ जुलै, इ.स.२०१६) हे एक मराठी कवी होते. त्य...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
तुळसी परब (जन्म : १९४१; मृत्यू : चेंबूर (मुंबई), ५ जुलै, इ.स.२०१६) हे एक मराठी कवी होते. त्यांचे बालपण मुंबईतील एका चाळीत गेले. भाषाशास्त्रात एम.ए. केल्यावर त्यांनी मंत्रालयात काही काळ नोकरी केली, पण त्यांचे मन तेथे रमले नाही.
 
त्या काळात प्रस्थापित साहित्यिकांच्या विपरीत लेखन करणारे अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, मनोहर ओक, राजा ढाले, वसंत गुर्जर, सतीश काळसेकर आदी तरुणांनी वाङ्‌नयसृष्टीत प्रवेश केला होता. तुळसी परब त्यांच्यात सामील झाले. लघुनियतकालिकांमधून परबांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. याच काळात त्यांचा ‘हिल्लोळ’ हा पहिला कवितासंग्रह १९७३ मध्ये प्रकाशित झाला. महानगरीय जीवन, प्रस्थापित व्यवस्था-अव्यवस्था व मानवी स्वातंत्र्य यांचे तत्कालीन वास्तव त्यांच्या ‘हिल्लोळ’मधील कवितांतून उमटले आहे.
 
यानंतरच्या काळात तुळसी परब यांनी काही वर्षे धुळे जिल्ह्यातील शहादा येथे शेतमजूर व आदिवासींसाठी चाललेल्या‘श्रमिक संघटना’ चालवीत असलेल्या चळवळीत काम केले. त्यात स्थानिक दांडग्या जमीनदारांचे हितसंबंध दुखावल्याने गुंडांकरवी त्यांना जबर मारहाणही सोसावी लागली. यावर त्यांनी ‘कवी, कविता आणि कुर्‍हाड’ नावाची कविता लिहिली आणि आपले काम तसेच चालू ठेवले. पुढे आणीबाणीविरोधी लढ्यात परबांनी काही महिने ‘मिसा’ कायद्याखाली विसापूरच्या तुरंगात दहा महिन्यांचा कारावास भोगला. कारावासात लिहिलेल्या कवितांचा ‘धादांत आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्यामधल्या कविता’ हा कवितासंग्रह तेव्हाच आला. ‘हिल्लोळ’मधील कवितांपेक्षा या कविता खूपच प्रगल्भ झालेल्या दिसून येतात.
 
मार्च १९७७मध्ये तुळसे परब तुरुंगातून सुटले. ३१ ऑक्टोबर १९७७ रोजी त्यांचे लग्न झाले. व दोघेही १९७९मध्ये ते औरंगाबादेत आले. लाल निशाण पक्षाचे काम ते करीत असत. नंतर तेथील ‘अजिंठा’ या दैनिकात ते रुजू झाले. दिवसभर मित्रमंडळींत काव्यवाचनात रमल्यानंतर दैनिकात ते कायम रात्रपाळीत काम करायचे. या दैनिकात तेव्हाच्या राजकीय परिस्थितीवर ‘ओज पर्व’ या टोपणनावाने ते लिखाण करीत.
 
तुळसीच्या काही साहित्यिक मित्रांच्या ओळखीने तुळसी परबांच्या पत्‍नी ...... यांना औरंगाबादेत विद्यापीठाची नोकरी मिळवली. या आधी त्या संगमनेरच्या कॉलेजात प्राध्यापक होत्या.
 
==तुलसी परब यांचे कवितासंग्रह==
Line १३ ⟶ १५:
* पाब्लो नेरुदांच्या कविता (अनुवादित)
* ‘मनोहर ओक’च्या ऐंशी कविता (संपादित, सहसंपादक चंद्रकांत पाटील)
* हिल्लोळ (पहिला काव्यसंग्रह)
* हृद
 
 
==पुरस्कार आणि सन्मान==
* २००५ साली [[विद्रोही साहित्य संमेलन]]ाचे अध्यक्षपद.
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/तुळसी_परब" पासून हुडकले