"इंदर मल्होत्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: इंदर मलहोत्रा (जन्म :चंदीगड, १९३०; मृत्यू : दिल्ली, ११ जून, इ.स. २०१६)...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
मलहोत्रांच्याा ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला यूपीआयचे वार्ताहर म्हणून काम केले. ‘दी स्टेट्समन’, ‘ टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रांत त्यांनी बराच काळ पत्रकारिता केली. ‘दी गार्डियन’चे भारतातील प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले, नंतर ते स्तंभलेखन करीत होते. राजकीय नेत्यांना त्यांनी जवळून पारखले, तटस्थ निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी बातमीचा स्रोत कधीही उघड केला नाही. त्यांची स्मृती तर चांगली होतीच, शिवाय आयुष्यभर त्यांना घटनांच्या नोंदी ठेवण्याची सवय होती. आजारी असतानाही जेव्हा बरे वाटेल तेव्हा ते पुन्हा स्तंभलेखनाला सज्ज असत.
 
इंदर मलहोत्रा यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये ‘रिअर व्ह्य़ू’ हा स्तंभ बराच काळ लिहिला. त्यात त्यांनी समकालीन भारताच्या इतिहासातील अनेक घटनांचा वेध घेतला. आणीबाणी, बांगला देश युद्ध अशा अनेक विषयांवर त्यांनी मते मांडली. विविध नेत्यांची बलस्थाने व कमकुवत घटक सांगतानाच त्यांनी त्याचे निर्णयांवर काय परिणाम झाले याचे विश्लेषण केले. नेहरूवादी असूनही त्यांनी चीन युद्धाच्या वेळी त्यांच्या धोरणावर परखड टीका केली होती. आजकाल पडद्यामागचे राजकारण फार कमी टिपले जाते, पण त्यांनी पत्रकार म्हणून ते फार बारकाईने टिपले होते.
 
==इंदर मलहोत्रा यांनी लिहिलेली पुस्तके==
* इंदिरा गांधी : अ पर्सनल अॅन्ड पॉलिटिकल बायॉग्राफी
* डायनॅस्टीज ऑफ इंडिया अॅन्ड बियाँड (२००३)
 
==पुरस्कार==
* रामनाथ गोएंका जीवनगौरव पुरस्कार (२०१३)
 
 
[[वर्ग:पत्रकार]]
[[वर्ग:इ.स. १९३० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१६ मधील मृत्यू]]