"इंदर मल्होत्रा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: इंदर मलहोत्रा (जन्म :चंदीगड, १९३०; मृत्यू : दिल्ली, ११ जून, इ.स. २०१६)...
(काही फरक नाही)

०१:४३, १७ जुलै २०१६ ची आवृत्ती

इंदर मलहोत्रा (जन्म :चंदीगड, १९३०; मृत्यू : दिल्ली, ११ जून, इ.स. २०१६) हे एक इंग्रजी पत्रकार होते. नेहरू फेलो व व्रुडो विल्सन फेलो या विद्यावृत्ती त्यांना मिळाल्या होत्या.

इंदर मलहोत्रा हेे उत्तम बातमीदार, राजकीय समीक्षक तर होतेच, पण बातमीदारी करताना संरक्षण क्षेत्रात त्यांच्याइतक्या चांगल्या पद्धतीने वार्तांकन कुणी केले नाही.

मलहोत्रांच्याा ५० वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला यूपीआयचे वार्ताहर म्हणून काम केले. ‘दी स्टेट्समन’, ‘ टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्रांत त्यांनी बराच काळ पत्रकारिता केली. ‘दी गार्डियन’चे भारतातील प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले, नंतर ते स्तंभलेखन करीत होते. राजकीय नेत्यांना त्यांनी जवळून पारखले, तटस्थ निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी बातमीचा स्रोत कधीही उघड केला नाही. त्यांची स्मृती तर चांगली होतीच, शिवाय आयुष्यभर त्यांना घटनांच्या नोंदी ठेवण्याची सवय होती. आजारी असतानाही जेव्हा बरे वाटेल तेव्हा ते पुन्हा स्तंभलेखनाला सज्ज असत.