"यशवंतराव भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: यशवंतराव गणपतराव तथा वाय.जी. भोसले (जन्म : इ.स. १९२६. मृत्यू : ४ जुलै,...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
भोसले हे [[मास्टर विनायक]] यांच्या कंपनीमध्ये सहायक म्हणून रुजू झाले. [[बाबुराव पेंढारकर]] यांच्या सूचनेनुसार ते रंगभूमीकडे वळले, आणि या क्षेत्रातील सैनिक बनून त्यांनी रंगभूमीची अखंडपणे प्रदीर्घ सेवा केली. रंगभूमीच्या माध्यमातून तरुण व हौशी कलावंताचे जीवन व कलाजीवन घडविण्यामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्च केले. या व्यवसायातून पसे मिळविणे यापेक्षा चित्रपट व नाटय़ क्षेत्रासाठी नवोदित कलाकारांमधून कसदार अभिनयाचे कलावंत घडविणे याचा त्यांनी ध्यास घेतला.
 
वाय.जी. भोसले यांनी ‘स्वप्नगंधा थिएटर’ नावाची संस्था स्थापन करून या संस्थेतर्फे [[शंकर खंडू पाटील]] यांच्या कांदबरीवर आधारलेले ‘भल्या घरची कामिनी’ हे नाटक रंगभूमीवर आणले होते. अनेक संस्थांची नाटके रंगभूमीवर आणत असताना ते केवळ नारळ व शाल एवढेच मानधन म्हणून ते स्वीकारत असत.
 
चित्रपट व व्यावसायिक नाट्यसृष्टीला अनेक कलावंत देण्यात वाय.जी.भोसले यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनेते [[अरुण सरनाईक]], [[उमा]], [[कामिनी भाटिया]], [[गणपत पाटील]], [[पद्मा चव्हाण]], [[राजशेखर]], [[लीला गांधी]], [[विलास रकटे], ‘पानिपतकार’ [[विश्वास पाटील]], [[शांता तांबे]], [[संध्या रायकर]], [[सूर्यकांत मांडरे]], आदी कलावंतांनी नाट्यकलेचे धडे घेऊन पुढे आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला.
 
==सन्मान==
* अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे मराठी चित्रपट निर्मिती अमृत महोत्सव सोहळ्यात चित्रपट अभिनेते [[शशी कपूर]] यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
* गायन समाज देवल क्लब तर्फे केशवराव भोसले जन्मशताब्दी सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला.
* [[व्ही.शातांराम]] यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष गौरव
* कलांजली संस्थेतर्फे नाटय़ कलायोगी पुरस्कार
* संस्कार भारती तर्फे करवीर भूषण पुरस्कार
* लोकशाहीर [[विठ्ठल उमप]] अभिवादन समितीतर्फे स्मृतिगौरव पुरस्कार, वगैरे