"मिलिंद चंपानेरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
चंपानेरकर यांनी १९९१ ते २००० या काळात इंडियन एक्सप्रेससाठी पत्रकारिता केली. त्यानंतर मात्र त्यांनी मुक्त पत्रकारितेवर भर दिला आणि स्वतःला भिडणार्‍या विषयांचा माग घेत भारतात अनेक ठिकाणी भटकंती केली. या भटकंतीतून त्यांनी लिहिलेले रिपोर्ताज पद्धतीचे लेख व अनुभव, ‘शाश्वत विकासासाठी’ या नियतकालिकामधून, तसेच दैनिक महाराष्ट्र टाइम्समधून प्रकाशित झाले आहेत. नक्षलग्रस्त भागांमधलं जनजीवन, आशियातील अल्पसंख्याकांच्या समस्या आणि राजकीय चळवळींचा मागोवा हे त्यांच्या विशेष अभ्यासाचे विषय आहेत. बस्तर व काश्मीर सारख्या अस्वस्थ प्रदेशांमध्ये फिरून तिथल्या सर्वसामान्य माणसांचे जगणे आणि त्यांचे म्हणणं मराठी समाजासमोर आणण्याचे काम चंपानेरकर सातत्याने करत आले आहेत. पॅलेस्टाईन प्रश्नासंबंधीच्या आशियाई देशांच्या शांतियात्रेत (२०१२) त्यांचा सक्रिय सहभाग होता.
 
‘पाकिस्तान-भारत पीपल्स फोरम फॉर पीस अॅन्ड डेमॉक्रसी’ या संस्थेच्या पुणे शाखेचे ते अध्यक्ष आहेत.
 
==मिलिंद चंपानेरकर यांची पुस्तके==
Line १३ ⟶ १५:
* वहिदा रेहमान : हितगुजातून उलगडलेली (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - नसरीन मुन्‍नी कबीर)
* सुन मेरे बंधु रे : एस.डी. बर्मन यांचे जीवन-संगीत. अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - सत्या सरन)
 
==पुरस्कार==
* मिलिंद चंपानेरकर यांच्या ‘लोकशाहीवादी अम्मीस... दीर्घपत्र’ला अनुवादित पुस्तकासाठीचा महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे.