"मेंदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
 
==मेंदीच्या झाडाचा आढळ आणि त्याची लागवड==
शास्त्रीयदृष्टय़ा मेंदीचा समावेश लिथ्रेसी (Lythranceae) कुळामध्ये होतो.
मेंदीचे झाड मूळचे आफ्रिकेतले असले तरी ऑस्ट्रेलिया, युरोप, कॅनडा, पाकिस्तान, इजिप्तपासून आखाती देशापर्यंत प्रसिद्ध आहे. वाळवंटी प्रदेशातले हे झाड भारतात महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या भागांत आढळते. मेंदीची रोपे बियांपासून तसेच छाट कलमांद्वारेही तयार करतात. ती कोणत्याही प्रकारच्या जमिनीत वाढू शकतात. वाळवंटी प्रदेशातले झाड असले तरी ते समुद्रकिनारीही छान वाढते. कोरड्या, उष्ण किंवा थंड हवामानातही तग धरू शकते. मुळे बर्‍यापकी खोलवर जात असल्यामुळे पूर्ण वाढलेल्या झाडाला पाणीही फारसे घालावे लागत नाही.
 
मेंदीची झाडे काटेरी असतात आणि गुरे या झाडाची पाने कडू असल्याने खात नाहीत, त्यासाठी ही कुंपणासाठी लावतात. मेंदीची झुडपे दीड ते तीन मीटर उंच वाढतात. पाने साधी समोरासमोर असतात. या झुडपांना पांढर्‍या रंगाची सुवासिक फुले येतात.
 
==उपयोग==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेंदी" पासून हुडकले