"सतीश बहादूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
==लेखन==
प्रा. सतीश बहादूर यांचे लेखन एकत्रित स्वरूपात कोठेही उपलब्ध नाही. त्यामुळे [[पुणे|पुण्यातील]] अक्षर वाङ्मय प्रकाशनानेे ‘प्रा. सतीश बहादूर (चित्रपटभाषा)’ नावाचा एक विशेष अंक काढला आहे. डॉ. श्यामला वनारसे या अंकाच्या अतिथी संपादक असून, डॉ. अरुण प्रभुणे या अंकाचे कार्यकारी संपादक आहेत.
 
==विशेषांकातील लेखांचा तपशील==
या विशेषांकात, चित्रपटाकडे एक कला म्हणून पाहण्याची दृष्टी दिलेल्या बहादूर यांनी स्वतः लिहिलेले आणि चित्रपट अभ्यासकांनी चित्रपट भाषेवर लिहिलेले लेख आहेत. चित्रपट अभ्यासकांसाठी हा अंक संदर्भ म्हणून विशेष महत्त्वाचा आहे.
 
विशेषांकाच्या पहिल्या भागात प्रा. सतीश बहादूर यांच्या लेखनातून चित्रपट रसास्वादाची संकल्पना उलगडण्यात आली आहे. दुसर्‍या भागामध्ये अरुण खोपकर, अशोक राणे, अनिल झणकर, सुषमा दातार, सतीश जकातदार, अभिजित देशपांडे, गणेश विसपुते आदी चित्रपट अभ्यासकांचे लेख या अंकामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
 
चित्रपट अभ्यासक समर नखाते यांची प्रदीर्घ मुलाखत हे या अंकाचे विशेष आकर्षण आहे. याशिवाय या अंकात सतीश बहादूर यांच्या कन्या नंदिनी बहादूर-गुप्ता, सुरेंद्र चौधरी यांनीही प्रा. बहादूर यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे.