"वेदकुमार वेदालंकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
डॉ. वेदालंकार यांनी हिंदीत अनुवाद केलेल्या मराठीतल्या ‘छावा’ या कादंबरीच्या १७वर आवृत्त्या निघाल्या आहेत. संत तुकाराम, संत एकनाथ व पु.ल. देशपांडे यांचे साहित्य हिंदीत नेऊन लोकप्रिय करण्याचे कार्य वेदालंकार यांनी केले आहे.
 
डॉ. वेदालंकार मूळचे लातूरचे. वेदकुमार रघुत्तमदास डुंबरे हे त्यांचे मूळ नाव. मुलाने वेदवाङ्मयामध्ये पंडित व्हावे, या वडिलांच्या इच्छेखातर ते वयाच्या सहाव्या वर्षी वेदांचे शिक्षण घेण्यासाठी हरियाणात गेले. आर्य समाजाच्या संस्कारामुळे मूळ आडनाव त्यागून वेदालंकार ही पदवी त्यांनी स्वीकारली. या काळात मराठी भाषा विसरल्याने त्यांनी ती पुन्हा आत्मसात केली. हिंदी व संस्कृत या विषयांत पारंगत होऊन डॉ. वेदालंकार यांनी प्राध्यापक व प्राचार्य म्हणून उस्मानाबाद व तुळजापूर येथील महाविद्यालयांमध्ये नोकरी केली. ते उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य होते.
 
निवृत्तीनंतर त्यांनी मराठी साहित्य हिंदी भाषेत उपलब्ध व्हावे, या विचाराने प्रेरित होऊन अनुवादाचे काम सुरू केले. [[शिवाजी सावंत]] हे प्रा. वेदालंकारांचे मित्र होते. छावाचा हिंदी अनुवाद करावा असा अट्टहास त्यांनी धरल्यामुळे वेदालंकारांच्या अनुवाद ग्रंथांची सुरुवात झाली.
 
डॉ. वेदकुमार वेदालंकार यांनी मराठीतील तीसहून अधिक ग्रंथ हिंदीत अनुवाद करून प्रसिद्ध केले आहेत. छावा, श्रीमान योगी, [[रा.र. बोराडे]] यांची पाचोळा (हिंदीत तिनका) यांसह [[पु.ल. देशपांडे]] यांच्या काही निवडक कथा, [[संत तुकाराम]] महाराजांची अभंग गाथा, शासनाच्या महात्मा [[जोतिबा फुले]] समग्र वाङमयाचे चार खंड अशा पुस्तकांचा हिंदी अनुवाद करून डॉ. वेदालंकार यांनी मराठी वाङमयाचा अमूल्य ठेवा हिंदी भाषिकांसाठी खुला केला आहे.
 
तुकारामांच्या ४ हजार ६०७ अभंगाचे अनुवादित निरूपण, तसेच संगीत सौभद्र, संगीत स्वयंवर, संगीत शारदा आणि कट्यार काळजात घुसली ही चार नाटके, एकनाथ महाराजांचे भारूड, बहिणाबाई चौधरी यांच्या २३० गीतांचा हिंदी पद्यानुवाद या साहित्याच्या हिंदी अनुवादाचे काम डॉ. वेदालंकारांच्या हातून घडले आहे. रायगडाची माहिती देणारी पुस्तिका आणि संत गाडगेबाबा यांच्यावरील अनुवादाचे काम पुरे होत आले आहे. [[अण्णा भाऊ साठे]] यांच्या तीन कादंबर्‍या आणि वीस कथांचा वेदालंकार यांनी केलेला अनुवाद प्रकाशित करण्यासाठी कोणीही पुढाकार न घेतल्याने तो प्रसिद्ध होऊ शकला नाही. (२०१६ची बातमी).
 
संगीत नाटकांतील पद्यांचाही त्यांनी शक्यतोवर मूळ चाल तशीच ठेवूनच अनुवाद केला आहे. गरज पडली तिथे वेदालंकारांनी व्रज भाषेचा आधार घेतला आहे.
 
==पुरस्कार==
* अनुवाद व आंतरभारती कार्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'श्रीपाद जोशी पुरस्कार. (२०१६)
 
==वेदकुमार वेदालंकार यांची अन्य पुस्तके==
* माझा भारत (अनुवादित, मूळ इंग्रजी माय इंडिया-लेखक जिम कॉर्बेट)
* म्हणे [[गोरा कुंभार]]
* संस्कृत सुभाषित सागर