"राजन इंदुलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ५३:
 
'''राजन इंदुलकर''' हे महाराष्ट्रातील शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे एक समाजसेवक आहेत. त्यांनी समाजाच्या विविध प्रश्नांवर कार्य करणारी 'श्रमिक सहयोग' ही संस्था स्थापन केली आहे. [[चिपळूण]] तालुक्यातील अलोरे गावाजवळील कोळकेवाडी येथे या संस्थेतर्फे 'प्रयोगभूमी' नावाची वंचित मुलांसाठीची निवासी शाळा चालवली जाते.
 
‘श्रमिक सहयोग’ या संस्थेची १९८४ साली स्थापना झाली. शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी काम करावे या उद्देशाने ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व लोकचळवळीचे मार्गदर्शक दत्ता सावळे यांच्या सहकार्याने संस्थेच्या प्रयोगशील कार्यकर्त्यांंनी वेळोवेळी चर्चासत्रे घेऊन दारिद्र्‍य भोगणार्‍या धनगर आणि कातकरी समाजातील वंचितांच्या शिक्षण विषयक शोधाचे कार्य १९९२ पासून हाती घेतले. चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगरांत राहणार्‍या धनगर आणि कातकरी समाजातील मुलांसाठी वस्त्यावस्त्यांवर जाऊन मुलांना अक्षर ओळख करून देण्याचा प्रयत्‍न चालवला. आम्ही ठरवू तेच शिक्षण तीच पद्धती असा आग्रह धरल्यामुळे या वैविध्यपूर्ण समाजांना शिक्षणासाठी वंचित रहावे लागले. ही गोष्ट लक्षात घेऊन निसर्गाच्या जडण घडणीसोबत वाढलेल्या या मुलांना आवडेल, समजेल आणि ते विद्यार्थी, शाळेपासून दूर न पळता शैक्षणिक प्रवाहात सामील होतील अशा प्रकारचे शिक्षण या वस्त्यांमध्ये जाऊन देण्याचे काम संस्थेने केले. अगदी या विद्यार्थ्यांच्या मागूनच शाळा फिरवली असे म्हटल्यास हरकत नाही.
 
==प्रयोगभूमी==
संस्थेने २००४ सालात कोळकेवाडीच्या माळावर ‘प्रयोगभूमी’ या नावीन्यपूर्ण शिक्षण केंद्राची सुरुवात केली. येथे शासनाचे कोणतेही अनुदान नाही किंवा शासनाचा एक नवा पैसा देखील न घेता ४० मुला-मुलींना सातवीपर्यंत शिक्षण दिले जाते. शिक्षण, निवास, भोजन इत्यादी गोष्टी मोफत येथे आहेत. पूर्णवेळ असे दोन शिक्षक सहकुटुंब विद्यार्थ्यांसोबत राहतात. त्याशिवाय राजन इंदुलकर व लोक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. विजय साठे हे देखील अधून-मधून याठिकाणी विद्यार्थ्यांसोबत राहतात. या शाळेत अनौपचारिक पद्धतीने शालेय शिक्षण, व्यवसाय शिक्षण, कलाकौशल्याचे शिक्षण या तीन स्तराचे शिक्षण दिले जाते. एक सुंदर कुटुंब येथे पहायला मिळते.
 
पुण्यामधील नवम संस्थेने शाळेच्या दैनंदिन खर्चाचा भार उचललेला आहे. सकाळ रिलीफ फंड, पुणे यांनी इमारत बांधकामाचा खर्च केलेला आहे. इतर संस्था आणि व्यक्तींच्या सहकार्यातून शाळेचा खर्च चालत असतो. दुर्गम भागातील २६ वाडयांवर संस्थेने चालवलेल्या अनौपचारिक शाळेतील ४५० मुले शिकती झाली आहेत. सस्थेची प्रयोगभूमी आज १६ एकर जागेमध्ये कार्यरत आहे. निसर्ग शेती, वनसंवर्धन, दुग्धव्यवसाय, शेळीपालन, सूर्य ऊर्जा, सूक्ष्म जलविद्युत केंद्र असे ग्रामीण विकासाचे पथदर्शक उपक्रम येथे उभे राहिले आहेत. विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षण घेतानाच शेतीची कामे, मासेमारी आदी विविध गोष्टी करताना पहायला मिळतात. संस्थेचे कार्यकर्ते आणि शिक्षक या निसर्गाशी नाते असलेल्या विद्यार्थ्यांचे राहणीमान त्यांची बोलीभाषा सुधारण्यासाठी त्यांच्याच कलाने त्यांना बदलत नेण्याचा प्रयत्‍न करीत असतात.
 
‘प्रयोगभूमी’मध्ये ग्रामीण कार्यकर्त्यांच्या अभ्यासासाठी ४ हजार ५०० संदर्भ ग्रथांचे ग्रंथालय उभारण्यात येत आहे. ग्रामीण मुलांसाठी संगणक शिक्षण, विज्ञान प्रयोगशाळा आहे. शाळांना जोडून गांडूळ खत, वनऔषधी इत्यादी उत्पादने काढून शाळा चालवली जाते.
 
==पुस्तक==
राजन इंदुलकर यांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारे ‘कर्ती माणसं - राजन इंदुलकर’ या नावाचे पुस्तक राम जगताप यांनी लिहिले आहे.
 
==पुरस्कार==