"कबाब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
 
==टुंडेके कबाब==
अवध प्रांताचा नवाब असदउद्दौला खाण्याचा विलक्षण शौकिनशौकीन होता. त्याचा मुख्य आचारी हाजीमुराद अली हा एक निष्णात बल्लवाचार्य होता. कबाब हा पदार्थ अधिक चवदार होण्यासाठी तो सतत वेगवेगळे प्रयोग करून पाहत असे. मात्र एके दिवशी तो छपरावरून खाली पडला आणि त्याचा हात कायमचा जायबंदी झाला. पण तरीही या घटनेने त्याला कबाबवरील नवनव्या प्रयोगांपासून रोखले नाही. अतिशय मेहनतीने १६० विविध मसालमसाले, तसेच घटकपदार्थ यांच्या वापराने या हाजीने एकहाती जे कबाब बनवले ते चवीला अद्वितीय होते. हात नसलेल्या माणसाला ‘टुंडा’ म्हणतात. त्या हाजीच्या जायबंदी हातामुळे या कबाबना टुंडटुंडे के कबाब म्हणून जे नाव मिळाले ते आजतागायत कायम आहे. लखनौ भागातभागातील टुंडेकेटुंडे के कबाब विलक्षण लोकप्रिय आहेत.
 
==काकोरी कबाब==
लखनौच्या सय्यद मोहम्मद हैदर काझमी या नवाबाने ब्रिटिश अधिकारी मित्रास मेजवानीकरता आमंत्रित केले होते. लखनवी दावतची खासियत असणारे सीगकबाब या ब्रिटिश मित्रासमोर पेश केले गेले. पण त्या ब्रिटिश अधिकार्‍याने मात्र त्या कबाबच्या चवीबद्दल टिप्पणी करताना मांस मऊसर नसल्याबद्दल टीका केली. खाणे, पिणे आणि खिलवण्याचा शौक असलेल्या नवाबाला ही टीका जिव्हारी लागणे स्वाभाविक होते. त्याने आपल्या सर्व आचार्‍यांना पाचारण करून असे खास कबाब तयार करायला सांगितले, की जे चवीसोबत चावायलाही उत्तम असतील. या आचार्‍यांनी त्या मोसमाचा विचार करत कच्ची कैरी आणि पपईची पेस्ट त्या मांसाला लावून जे कबाब बनवले तेे चवीला उत्कृष्ट होते. ह्याच कबाबांना काकोरी कबाब हे नाव पडले.
 
==अन्य कबाब==
जगभरातल्या विविध देशांत विविध प्रकारचे कबाब आवडीने खाल्ले जातात. भारतीय उपखंडात कलमी, तंगडी, बोटी, राजपुती, रेशमी, लसूणी, शामी, हराभरा, हरियाली, आणि इतर बरेच कबाब लोकप्रिय आहेत.
 
आजही रानात जाळ करून त्यावर मांस भाजून खाणार्‍या जमाती आहेत. पण कबाब मात्र फक्त भाजणे या कृतीपुरता न थांबता भारतीय मसाल्यांची पुरेपूर चुणूक दाखवत जगभरातील खवय्यांच्या जिव्हा तृप्त करत आहे.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/कबाब" पासून हुडकले