"मल्लखांब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
दुसर्‍या बाजीरावाच्या काळातील मल्लखांब या खेळाचे आद्यगुरू म्हणून बाळंभट देवधर (जन्म : इ.स. १७८०; मृत्यू : इ.स. १८५२) यांचे नाव घेतले जाते. मीनल बाठे यांनी ‘एक होता बाळंभट’ नावाचे बाळंभटांचे चरित्र लिहिले आहे. त्या पुस्तकात मल्लखांबाचा इतिहासही आला आहे. [[बडोदा]] येथील दत्तात्रेय करंदीकर यांच्या व्यायामकोशाचा ३रा खंड इ.स. १९३२मध्ये प्रकाशित झाला. या खंदात बाळंभट देवधरांचे मल्लखांबाचे आद्यगुरू म्हणून उल्लेख आहे. महाराष्ट्राबाहे [[उज्जैन]] आखाडा, [[झांशी]] व [[ग्वाल्हेर]] आखाड्यांचे स्मृतिअंक, [[वाराणसी]] येथील व्यायाम नावाचे मासिक्यांत बाळंभटांपासून सुरू झालेली व्यायाम परंपरा आणि मल्लखांब यांचा उल्लेख आहे. [[गुजराथ]]मध्ये आजही मल्लखांब असलेली आखाडे आहेत.
 
मराठी माणसाने देशभरात मल्लखांबाला लोकमान्यता मिळवून दिली. बाळंभट देवधरांच्या या चरित्रपुस्तकात मल्लखांब खेळासंबंधात चार पिढ्यांचा इतिहास आला आहे. इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे. [[बडोदा]], [[मिरज]] आणि [[वाराणसी]] येथे सापडलेले ग्रंथ, कागदपत्रे, आखाड्यांची इतिवृत्ते यांच्या आधारे हा चरित्र ग्रंथ लिहिणे शक्य झाले.
 
==स्वरूप==
"https://mr.wikipedia.org/wiki/मल्लखांब" पासून हुडकले