"वा.द. वर्तक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. वामन दत्तात्रेय वर्तक (जन्म भोर संस्थान., १९ नोव्हेंबर, इ.स. १९...
(काही फरक नाही)

१३:४८, १७ जून २०१६ ची आवृत्ती

डॉ. वामन दत्तात्रेय वर्तक (जन्म भोर संस्थान., १९ नोव्हेंबर, इ.स. १९२५; मृत्यू : पुणे, १७ एप्रिल, इ.स. २००१) हे एक मराठी वनस्पती शास्त्रज्ञ होते.

डॉ. वा..द.वर्तक यांचे शिक्षण पुण्यात झाले. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असताना प्रा. आपटे आणि प्रा. कोल्हटकर यांच्यामुळे त्यांना वनस्पतिशास्त्राची गोडी लागली. पुण्याचा परिसर, गोव्यापर्यंतची सह्याद्रीची पर्वतराजी येथे ते झाडे बघत आणि त्यांचा अभ्यास करीत पायी फिरले होते. फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी दहा वर्षे वनस्पतिशास्त्राचे अध्यापन केले. त्यानंतर प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या विज्ञानवर्धिनी या संशोधन संस्थेत ते वनस्पतिशास्त्राचे एक संशोधक म्हणून काम करू लागले. त्या वेळी तेथे डॉ. आघारकर कार्यरत होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रा. वर्तक यांनी वनस्पतिसमूहावर आपला पीएच.डी.चा प्रबंध लिहिला. तेथे प्रा. वर्तक काही काळ वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख होते आणि नंतर ते त्या संस्थेचे संचालक म्हणून तेथून निवृत्त झाले.