"सुंदरी (वृक्ष)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुंदरी (इंग्रजीत लुकिंग ग्लास मॅग्रोव्ह, शास्त्रीय नाव Heritiera littoralis)...
(काही फरक नाही)

१२:११, १३ जून २०१६ ची आवृत्ती

सुंदरी (इंग्रजीत लुकिंग ग्लास मॅग्रोव्ह, शास्त्रीय नाव Heritiera littoralis) हा वृक्ष प्रामुख्याने बंगालमधील सुंदरबनाच्या दलदलीत मोठ्या प्रमाणात आढळतो. त्याचे इंग्रजी नाव पानाच्या खाली असलेल्या चंदेरी आवरणामुळे आले आहे. सुंदरबन हे नाव बंगालमधील त्या जागेस कदाचित या वृक्षाच्या नावावरूनच आले असावे.

सुंदरी हे या वृक्षाचे बंगाली नाव आहे. तिवरांच्या गटात मोडणारा हा वृक्ष आहे.

सुंदरी वृक्षाची पाने साधारण वडाच्या पानाच्या आकाराची असतात. वरून हिरवी आणि खालच्या बाजूला चंदेरी व थोडी खरखरीत असतात. नर-मादी फुले एकाच झुपक्यात येतात आणि सर्व फुलांवर नाजूक लव असते. फुलं घंटेच्या आकाराची ५ मिमी लांबीची, साधारण पिवळट हिरव्या रंगाची असतात. फळ टणक, होडीसारखे, गडद भुरकट रंगाचे आणि ४-८ सेमी लांब असते.

जुन्या व संपूर्ण वाढ झालेल्या वृक्षास रिबनसारखी नागमोडी वळणाची आधारमुळे असतात. ही मुळे फारच भव्य दिसतात. आणि वृक्षास एक वेगळेच स्वरूप प्रदान करतात.

हा वृक्ष महाराष्ट्रात दुर्मीळ आहे.. सिंधुदुर्गातील समुद्रकिनारी असलेला एकमेव सुंदरी वृक्ष एका देवराईत आहे. दुगोंबा राईत सुंदरीचे पन्नासएक वृक्ष असल्याची नोंद आहे. या वृक्षास येथे मोठ्या आधारमुळ्या तयार झाल्या आहेत. सुंदरीला या भागात समुद्रकांडोळ असे नाव आहे. मुंबईत राणीच्या बागेत एक सुंदरी वृक्ष होता, पण त्याची एक फांदी मोडल्यामुळे तो पूर्ण वृक्षच तोडला गेला.