"महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) ही पुण्यातील बालवर्गापासून ते...
(काही फरक नाही)

११:४५, १० जून २०१६ ची आवृत्ती

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (MES) ही पुण्यातील बालवर्गापासून ते पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेचे आधीचे नाव ‘Poona Native Institution’ असे होते. १८६० साली महागावकर पुण्यात खासगी शिक्षणवर्ग चालवीत असत. त्यांच्या पश्चात बापू भाजेकरांनी ते काम पुढे चालू ठेवले. या खासगी वर्गांचे इ.स. १८६० साली वामन प्रभाकर भावे, वासुदेव बळवंत फडके आणि लक्ष्मण नरहर इंदापूरकर यांनी Poona Native Institutionमध्ये रूपांतर केले. महान क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके हे संस्थेचे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुण्यात मुलांची भावे स्कूल, मुलींची भावे स्कूल (रेणुका स्वरूप मेमोरिअल हायस्कूल), बालशिक्षण मंदिर, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट, आणि एमईएस कॊलेज ऊर्फ आबासाहेब गरवारे आर्ट्‌स, सायन्स कॉलेजे आणि गरवारे कॉमर्स कॉलेज चालवते. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पुण्याव्यतिरिक्त अहमदनगर, कळंबोली, पनवेल, बारामती, बेलापूर, रत्‍नागिरी, सासवड, शिरवळ आदी गावांमध्ये शाळा आहेत.