"दिनेश आणि तारकेश्वरी राठोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दिनेश आणि तारकेश्वरी राठोड हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे एक मराठ...
(काही फरक नाही)

२२:२१, ८ जून २०१६ ची आवृत्ती

दिनेश आणि तारकेश्वरी राठोड हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे एक मराठी जोडपे आहे. हे दोघे पती-पत्‍नी पुण्याच्या पुणे पोलीस दलात कार्यरत आहेत. २३ मे २०१६ रोजी जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करत त्यांनी नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

दिनेश राठोड हे पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाईपदावर काम करीत असून, तारकेश्वरी राठोड महिला पोलीस नाईक आहेत. पुणे पोलीस दलात दोघे २००६ साली भरती झाले. दोघांनी २०१५ सालापासून माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा चंग बांधला होता. त्या वर्षी त्यांना एव्हरेस्ट सर करण्याची परवानगी मिळाली होती. मात्र, नेपाळमध्ये भूकंप झाल्याने त्यांना मोहीम अर्धवट सोडून परतावे लागले. अखेरीस २०१६ साली ते यशस्वी झाले.

यापूर्वी दिनेश आणि तारकेश्वरी राठोड या दोघांनी पोलीस दलामार्फत अनेक मोहिमांत भाग घेतला आहे. एव्हरेस्ट मोहिमेपूर्वी दोघांनी ऑस्ट्रेलियातील सर्वोच्च दहा शिखरे पादाक्रांत केली होती.