"मंगळ ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २७५:
 
== पृथ्वीवरून निरीक्षणाच्या संधी ==
मंगळ दर २७ महिन्यांनी पृथ्वीजवळ येतो. मात्र, दरवेळी तो कमी जास्त अंतरावर असतो. याला कारण मंगळ व पृथ्वी यांच्या सूर्याभोवतालच्या कक्षा पूर्ण गोलाकार नसून, किंचित लंबवर्तुळाकार आहेत. यामुळे मंगळ जवळ येताना पृथ्वीपासून ५.५७ कोटी ते १०.१ कोटी किलोमीटरपर्यंत येत असतो. त्याच्या या जवळ येण्याचे १५-१७ वर्षांचे चक्र असते. यापूर्वी २००३ मध्ये तो पृथ्वीच्या अगदी जवळ म्हणजे अवघ्या ५.५७ कोटी किमी अंतरावर आला होता.
 
२२ मे २०१६ रोजी आणि त्यानंतर ३० मे २०१६ रोजी मंगळ पृथ्वाच्या अगदी जवळ ाला होता. इतका जवळ या पूर्वी साठ हजार वर्षांपूर्वी आला होता. आता यानंतर ऑगस्ट २२८७ मध्ये पुन्हा मंगळ पृथ्वीलगत येईल.
 
===मंगळाची प्रतियुती===
मंगळ, पृथ्वी व सूर्य जेव्हा एका ओळीत येतात त्या स्थितीस मंगळाची प्रतियुती (अपोझिशन) म्हणून ओळखले जाते. २२ मे २०१६ रोजी अशी प्रतियुती झाली.
 
अशाच एका प्रतियुतीच्या वेळी म्हणजे १८७७ मध्ये मंगळाभोवती दोन चंद्र असल्याचा शोध लावला गेला. मुळातच मंगळ छोटा व तेजस्वी दिसत असल्याने त्याभोवतालचे चंद्र शोधणे अवघड होते. मात्र, वॉशिंग्टनच्या नेव्हल ऑब्झरव्हेटरीच्या 'अस्फ्हॉल' नावाच्या निरीक्षकाने मंगळाभोवतालचे अवघ्या १५-२० किमी आकाराचे बटाट्यासारखे दिसणारे चंद्र शोधले.
 
===कालव्यांचा शोध?===
मंगळाच्या १८७७ च्या प्रतियुती वेळी जीओव्हानी शापरेली नावाच्या इटालियन खगोल निरीक्षकाने मंगळाची निरीक्षणे साडेआठ इंची दुर्बिणीतून घेऊन त्याचा छानसा नकाशा प्रसिद्ध केला. मंगळावरच्या रेघोट्यांना त्याने 'कॅनली' म्हटले. या इटालियन शब्दाचे भाषांतर इंग्रज लोकांनी 'कॅनॉल' असे करून एकच गोंधळ उडवून दिला. मंगळावर कॅनॉल असल्याची समजून काही लोकांनी करून घेतली. अमेरिकी हौशी आकाश निरीक्षक पर्सिव्हल लॉवेल याने तर स्वतःचे पैसे खर्च करून मंगळ निरीक्षणासाठी वेधशाळा बांधली. त्याचे त्याची निरीक्षणे 'मार्स' नावाच्या पुस्तकात मांडली. लॉवेलच्या मते मंगळावर प्रगत जीवसृष्टी असून, तेथील लोकांनी शेतीसाठी मंगळावर कॅनॉलचे जाळे बांधले आहे. याचमुळे मंगळाविषयीचे अनेक गैरसमज सर्वसामान्यांमध्ये पसरत गेले. मात्र, कालांतराने मोठ्या दुर्बिणीतून निरीक्षणे घेतल्यावर मंगळावर कालवे नसल्याचे सिद्ध झाले.
 
== मानवी संस्कृतीमध्ये मंगळाचे स्थान ==
[[ हिंदू धर्म|हिंदू धर्मातील]] नवग्रह स्तोत्रात असा श्लोक आहे की,
"https://mr.wikipedia.org/wiki/मंगळ_ग्रह" पासून हुडकले