"व्होल्गा (लेखिका)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: तेलुगू लेखिका व्होल्गा या पहिली स्त्रीवादी तेलुगू साहित्यिक आह...
(काही फरक नाही)

०५:२५, २९ मे २०१६ ची आवृत्ती

तेलुगू लेखिका व्होल्गा या पहिली स्त्रीवादी तेलुगू साहित्यिक आहेत.

व्होल्गा आंध्र प्रदेशातील गुंटूरच्या. पोपुरी ललिताकुमारी हे त्यांचे मूळ नाव. गुंटूर येथून १९७२मध्ये एम. ए. (तेलुगू) झाल्यानंतर १९७३ ते ८६पर्यंत त्यांनी तेनाली येथे अध्यापन केले. वडिलांच्या उदारमतवादी विचारांमुळे त्यांच्या मनात लहानपणीच 'स्त्रीवाद' रुजला. श्री. कुटुंबराव यांच्या सहवासात त्यांनी तो प्रत्यक्षात आणि साहित्यातही जोपासला.

आंध्रज्योती या लोकप्रिय वर्तमानपत्राच्या पुरवण्यांमध्ये लिहिलेल्या लेखांमुळे व्होल्गा यांचे स्त्रीवादी वैचारिक लेखन व साहित्यचर्चा घराघरात पोहोचली.

व्होल्गा यांच्या ‘स्वेच्छा’ या कादंबरीने तेलुगू कादंबरीने विक्रीचे सर्व उच्चांक मोडले. 'स्वेच्छा'च्या पन्नास हजाराहून अधिक प्रती विकल्या गेल्या. नॅशनल बुक ट्रस्टद्वारा ती सर्व भारतीय भाषांत गेली.

त्यांचे आठ कथासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांचे इंग्रजी अनुवादही झाले. 'विमुक्ता' या पारितोषिकप्राप्त पुस्तकातील कथा मराठीतही आल्या.

व्होल्गा यांचे साहित्य

  • अमूल्यम (कथासंग्रह, १९९५)
  • अयोनी व इतर कथा (कथासंग्रह, १९९५)
  • आकाशजलो संगम्‌ (आकाशाचा अर्धा भाग, कादंबरी, १९९०)
  • कन्निटी केरटला पेन्नाला (कादंबरी, १९९१)
  • गुलबिलु (कादंबरी, २०००)
  • प्रयोगम (कथासंग्रह, १९९५)
  • मानवी (कादंबरी, १९९८)
  • राजकीय कथालु (कथासंग्रह, १९९३)
  • विमुक्ता(पारितोषिकप्राप्त कथासंग्रह)
  • सहजा (कादंबरी, १९९५)
  • स्वेच्छा (कादंबरी, १९९४)