"अविनाश जोगदंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३१:
==अधिक प्रगती==
अविनाशच्या ‘रामेलेक्स’ने मग मागे वळून बघितलेच नाही. आज उच्चदाब वीजवाहिनी यंत्रणा उभारणाऱ्या देशातील काही मोजक्या कंपन्यांच्या यादीत ‘रामेलेक्स’चा समावेश होतो. कोट्यवधींची वार्षिक उलाढाल असलेल्या या कंपनीचे मुख्यालय पुण्याच्या एनडीए रस्त्यावरील दांगट औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. देशातील अनेक राज्यांत या कंपनीची कामे सध्या सुरू आहेत. आज अडीचशे कामगार या कंपनीत काम करतात.
 
==कामगार वसाहत==
कामगारांकडून चांगले काम करून घेता यावे म्हणून अविनाशने पुण्याजवळ ४० हजार चौरस फुटांचा एक भूखंड विकत घेतला आणि त्यावर या कामगारांसाठी एक वसाहत उभारून दिली. यात फ्लॅट आहेत, सिंगल रूम्स् आहेत, शाळा आहे, मोठे सभागृह आहे आणि खेळाचे मैदानही आहे.
 
‘रामेलेक्स’ कंपनीचे काम सकाळी नऊ वाजता सुरू होते. सर्व कर्मचारी, अविनाश, त्याचे काका, कंपनीची वित्त संचालक असलेली त्याची पत्‍नी हे सारे जमले की राष्ट्रगीताने कामाला सुरुवात होते. सायंकाळी सहा वाजता काम संपले की अर्धा तास ध्यानधारणा होते. प्रत्येक सुटीच्या दिवशी पूर्ण जोगदंड कुटुंबीय या वसाहतीत असतात. कामगार व कर्मचाऱ्यांसोबत वेळ घालवतात. प्रत्येक महिन्यात वसाहतीत एका नामवंताचे व्याख्यान होते.
 
‘रामेलेक्स’ ही कंपनी खासगी असली तरी प्रत्येक कर्मचाऱ्याला ती आपलीच वाटते. लहान असताना वडिलांनी स्वामी विवेकानंद व तुकडोजींच्या आश्रमात पाठवले. तेथे मनात रुजलेले सेवेचे संस्कार आता असे कामी आले.