"अविनाश जोगदंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ८:
 
अर्धवट शिक्षण झालेल्या अविनाशने पुण्याला एका कंत्राटदाराकडे सुपरवायझरचे काम स्वीकारले. इमारत बांधणीचे काम करणारे हे मजूर वेळ वाया घालवतात, हे लक्षात आल्यावर अविनाशने त्यांच्या कामाच्या वेळेआधीच साहित्य उपलब्ध करून देत त्यांचे दुपारच्या जेवणाचे डबे एकत्र करायला सुरुवात केली. यामुळे काम वेगात होऊ लागले. हे बघून कंत्राटदारही खूश झाला. अविनाश दीड वर्षे त्यांच्याकडे राबला. पण एक पैशाचाही मोबदला त्याला मिळाला नाही व त्यानेही मागितला नाही.
 
==दीड्शे रुपयांची उसनवारी==
एक दिवस गावी आजोबा आठवण काढताहेत असा निरोप अविनाशला मिळाला. हा निरोप मिळताच अविनाशने कंत्राटदाराकडे गावी जाण्यासाठी दीडशे रुपये मागितले. त्याने ते देण्यास नकार दिला. त्याने त्याक्षणीच ते काम सोडले. काकांकडून उसने पैसे घेतले व गावी परतला.
 
==वायरिंगचे काम==
गावात अनेकांनी त्याची टिंगल केली. घरी बोलणी खावी लागली. त्यामुळे व्यथित झालेल्या अविनाशने पुन्हा पुण्याचा रस्ता धरला. आता काकांची उसनवारी फेडण्यासाठी त्यांच्याच सोबत वायरिंगचे काम करायचे असे त्याने ठरवले. नवीन बांधकामे शोधायची, कंत्राटदाराला गाठायचे आणि इलेक्ट्रिक वायरिंगचे काम मिळेल का, ही चौकशी करायची- असा अविनाशचा दिनक्रम १९९२ पासून सुरू झाला.
 
==मोठी कामे==
अविनाश व त्याच्या काकांना एका बडय़ा बांधकाम व्यावसायिकाच्या इलेक्ट्रिक हाऊस वायरिंगचे काम मिळाले. काका, पुतण्या व त्यांच्या हाताखाली काम करणारे चार मजूर एवढय़ा मनुष्यबळावर त्यांनी विक्रमी कालावधीत हे काम पूर्ण केले. आणि मग अनेक मोठी कामे त्यांना मिळायला सुरुवात झाली.
 
==वीजवहन क्षेत्रातील कामे==
केवळ वायरिंगची कामे करून भागणार नाही, तर वीजवहनाच्या क्षेत्रातील इतर कामे केली तरच मोठे होता येईल, हे लक्षात आल्यावर अविनाशने वीज मंडळात कामे मिळावी म्हणून प्रयत्‍न सुरू केले.
 
खूप प्रयत्‍नांनंतर अविनाशला पुण्याजवळ भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम मिळाले. मग वीज मंडळाची उपकेंद्रे व केंद्रे उभारण्याची कामे त्यांना मिळू लागली.
 
==कंपनीची स्थापना==
१९९४ मध्ये अविनाश व त्याच्या काकाने रामेलेक्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली व तिच्या माध्यमातून वीजवहनाच्या क्षेत्रातील कामे मिळवायला सुरुवात केली.
 
==कॉम्प्रेशन टाइप क्लॉप्स==
वीज मंडळाची कामे करताना अविनाशच्या कंपनीने वीज वाहून नेताना होणारी हानी कशी टाळता येईल, यादृष्टीने संशोधन सुरू केले. यातून त्यांना ‘कॉम्प्रेशन टाइप क्लॉप्स अॅन्ड कंडक्टर’ ही पद्धत सुचली.
 
==अधिक प्रगती==
अविनाशच्या ‘रामेलेक्स’ने मग मागे वळून बघितलेच नाही. आज उच्चदाब वीजवाहिनी यंत्रणा उभारणाऱ्या देशातील काही मोजक्या कंपन्यांच्या यादीत ‘रामेलेक्स’चा समावेश होतो. कोट्यवधींची वार्षिक उलाढाल असलेल्या या कंपनीचे मुख्यालय पुण्याच्या एनडीए रस्त्यावरील दांगट औद्योगिक वसाहतीमध्ये आहे. देशातील अनेक राज्यांत या कंपनीची कामे सध्या सुरू आहेत. आज अडीचशे कामगार या कंपनीत काम करतात.