"वामन केंद्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन, replaced: सिध्द → सिद्ध
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''वामन केंद्रे''' हे एक मराठी नाट्यदिग्दर्शक आहेत. त्यांचा जन्म दरडवाडी (बीड जिल्हा तालुका केज) येथे झाला. माधवराव व मुक्ताबाई केंद्रे या शेतकरी दाम्पत्याचा वामन हा मुलगा. त्यांचे वडील माधवराव केंद्रे हे एक प्रसिद्ध भारूडकार होते. कोरडवाहू शेतीवरच कुटुंबाची उपजीविका. घरात वारकरी परंपरा, पूर्वजांकडून आलेल्या भजन, ओव्या व भारुडांचा वारसा. माधवराव यांचा शेतीनंतर भारुड हा आत्मा. ते भारुडासाठी अनेक ठिकाणी जात. भारुडाचे सादरीकरण अप्रतिम असे. ग्रामीण लोककला, परंपरा, श्रद्धा यांचा साहजिकच लहानपणी वामनरावांवर संस्कार होत गेला. शाळेसाठी ५ किलोमीटर बाभळगावला पायपीट होई. याच गावात जत्रेत हरहुन्नरी वामन यांनी पहिल्यांदा नाटक सादर केल्याने शाबासकी मिळाल्याने मनात नाटकाची आवड खोलवर कायमची रुजली.
 
सातवीपर्यंत नेकनूर येथून शालेय शिक्षण घेऊन महाविद्यालयीन शिक्षणासाठी बीडच्या नवगण महाविद्यालयात दाखल झाले. या काळात मुलांवर डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांचा मोठा प्रभाव होता. या चळवळीत केंद्रेही ओढले गेले. त्यावेळी श्रीराम बडे यांची भेट झाली. दोघांनाही नाटकाची आवड. महाविद्यालय स्नेहसंमेलन व विविध कार्यक्रमांतून त्यांची नाटके रंगू, गाजू लागली. नाटकाचे वेड लागल्याने ज्येष्ठ नाटककारांबरोबर डोक्यावर प्लॅट(?) घेऊन हे तरुण नाट्यवेडे पडेल ते काम करीत. राष्ट्रीय नाट्य विद्यालय व एन.सी.पी.ए.मध्येही त्यांनी नव्या कलावंतांना भारूड शिकवले होते.'''वामन केंद्रे''' यांनी नॅशनल थिएटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌स या संस्थेतून नाट्यशिक्षण घेतले. तिच्या माध्यमातूनच देशातील सर्वोच्च नाट्य प्रशिक्षण संस्था असलेल्या दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात(NSD)त प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्नप्रयत्‍न सुरू झाले. पहिल्या प्रयत्नातप्रयत्‍नात यश न आल्यामुळे ते औरंगाबाद येथे विद्यापीठात एक वर्ष नाट्य प्रशिक्षण घेऊन आले आणि अखेर 'एनएसडी' प्रवेश घेतला. याच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या (एनएसडी) संस्थेच्या संचालकपदी केंद्रे यांची नुकतीच निवड झाली. या नव्या जबाबदारीमुळे केंद्रे यांच्या शिरपेचात मानाचा तुराच खोवला गेला आहे.
 
शहरातील बालगंधर्व रंगमंदिरात एक दिवस नाटक करण्याची संधी मिळाली आणि त्या रात्रीतून वामन केंद्रे त्या काळात 'स्टार' बनले. डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांशी जोडले गेलेल्या वामन केंद्रे यांना इतर कोणत्याही व्यासपीठापेक्षा नाटकाच्या व्यासपीठावरून आपली भूमिका सक्षम आणि मोकळेपणाने मांडता येते, हे लक्षात आल्याने त्यांनी नाटकातच करिअर करण्याची खूणगाठ बांधली.
ओळ ८:
मराठवाड्याच्या मातीला नाट्य चळवळीचा मोठा देदीप्यमान वारसा लाभला. नाटकाचा ध्यास आणि श्वास हाच या मातीचा गुण बनला. नाटकाचे वेड अंगी भिनल्यानेच वामन केंद्रेंसारख्यांचे नाव मोठ्या आत्मीयतेने व गौरवाने घेतले जाते. पायजमा, नेहरू शर्ट व काखेत शबनम पिशवी अशा पेहरावात अत्यंत ग्रामीण भागातून आलेल्या केंद्रे यांना मराठी लोककलांची विलक्षण जाण आहे. पारंपरिक प्रथा, कला, लोककला, नाटकांतून आधुनिक पद्धतीने सादरीकरण करून नाट्य क्षेत्रात ''नवे पर्व'' सुरू करणाऱ्या केंद्रे यांनी कलावंतांच्याही पिढ्या घडवल्या. विद्यार्थी ते संस्थेचे प्रमुख हा नाट्य प्रवास गुणवत्ता व कठोर परिश्रमाचे फलित ठरला. त्यांची निवड या क्षेत्रात धडपडणाऱ्यांसाठी प्रकाशवाट ठरली आहे. प्रशिक्षण काळात याच माहितीचा वापर करून आधुनिक पद्धतीने नाटकांचे सादरीकरण केल्याने संस्थेचे लक्ष त्यांच्याकडे वळले. त्यातून केरळच्या लोककलांचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. प्रशिक्षण पूर्ण करून मुंबईत आलेल्या केंद्रे यांनी मराठी नाट्य परिषद शिबिरांचे अनेक वर्षे संचालन केले. याच काळात ए. के. हंगल व नारायण सुर्वे यांनी डबघाईला आलेल्या इप्टा या नाट्यसंस्थेचे नेतृत्व वामन केंद्रे यांच्याकडे दिले. या संस्थेच्या माध्यमातून झुलवा हे पहिले नाटक रंगमंचावर आले. या नाटकाने पुढे इतिहास निर्माण केला. मराठी माणसाच्या पारंपरिक प्रथा, श्रद्धा आधुनिकपणे मांडणारा हा प्रयोग यशस्वी झाला. त्यांनी भासकवीच्या मध्यम व्यायोग या नाटकाचे ’प्रिया बावरी’ या नावाने मराठी रूपांतर केले आहे.
 
सुसंस्कृत नाटककार भास लिखित 'मध्यम व्यायोग' हे नाटक याचे मराठी रूपांतर आणि रणांगण, मोहनदास, जानेमन ही नाटके आधुनिक पद्धतीने सादर करून केंद्रे यांनी नाट्य दिग्दर्शनाची संकल्पनाच बदलून टाकली. प्रयोगशिलता हा केंद्रेंचा स्थायीभाव. त्यामुळे इप्टाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नाट्य कलावंत जोडले. मुंबईत जम बसल्यानंतर ''विद्यापीठ'' ही नाट्यसंस्था स्थापन करून प्रिया बावरी, मोहे पिया आणि ओ माय लव्ह या नाटकांचा त्रिभाषिक प्रयोग एकाच कलावंतांच्या संचात मुंबईतील वेगवेगळया नाट्यगृहात सादर करून गर्दीचे उच्चांक मोडले. मुंबई विद्यापीठात नाट्यविद्येची स्वतंत्र 'ॲकॅडमीअॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट'ची सुरुवात केली. या शाखेची मांडणी, अभ्यासक्रम, स्वरूप हे केंद्रे यांच्या कल्पनेतून साकारले. मागील दहा वर्षांपासून या शाखेची धुरा ते सांभाळत आहेत. या शाखेने अनेक कलावंत निर्माण केले. त्यांची पत्नीपत्‍नी गौरी केंद्रे याही कलावंत असून त्या सध्या दूरचित्रवाहिनीवरील देवयानी या मालिकेतून काम करीत आहेत.
 
देशातील प्रमुख दिग्दर्शकांपैकी एक असा लौकिक मिळवलेल्या केंद्रे यांना कायम गावच्या मातीची ओढ असते. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी दरवाडी येथे माधवराव केंद्रे यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय भारूड महोत्सव सुरू केला. माणसं मोठी झाली की गाव विसरतात, पण केंद्रे यांची गावाकडची ओढ कायम आहे. आई, वडील निरक्षर, कोणतीही नाट्यकलेची परंपरा नसताना वामन केंद्रे यांनी अत्यंत कठीण परिश्रमातून यश मिळवले आहे. स्वतकडे गुणवत्ता असेल, प्रामाणिकपणे काम करण्याची तळमळ आणि नावीन्याचा वेध व कामाचा ध्यास असलेला माणूस प्रतिकूल परिस्थितीतूनही कोणत्याही क्षेत्रात नेत्रदीपक यश मिळवू शकतो, हेच सिद्ध होते. तीस वर्षांपूर्वी ज्या संस्थेत धडपड करून प्रवेश मिळवला. त्याच संस्थेच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाली, हे फार कमी लोकांना साध्य होते. त्यापकी वामन केंद्रे हे एक ठरले आहेत. त्यांच्या निवडीने पहिल्यांदाच या प्रतिष्ठेच्या एनएसडीच्या संचालकपदी मराठी माणसाची निवड झाली आहे. त्याहीपेक्षा सध्याही रस्ता नसलेल्या दरडवाडीत जन्मलेल्या वामन केंद्रे यांची निवड धडपडणाऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे.
 
कवी भास रचित ‘मध्यमव्यायोग’ या संस्कृत नाटकाचा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांतला प्रयोग केंद्रे यांनी मुंबईतील ‘एनसीपीए’मध्ये सादर केला होता. या तिन्ही भाषांमध्ये सादरकर्ता नटसंच तसेच दिग्दर्शक एकच होता. वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेले हे नाटक पंडुपुत्र भीमसेन, हिडिंबा आणि त्यांचा मुलगा घटोत्कच यांच्या जीवनावर बेतलेले आहे. भासाच्या या मूळ संस्कृत नाटकाचे मराठी रूपांतरही प्रा. केंद्रे यांनीच केले आहे, हे विशेष. या विश्‍वविक्रमाची नांदी एका रविवारी दुपारी दोन वाजता नसिरुद्दिन शहा यांच्या हस्ते ‘प्रिया बावरी’ (मराठी) या रूपांतरणाने झाली. नंतर चार वाजता ‘मोहे पिया’ (हिंदी), तर सात वाजता ‘ओ माय लव्ह’ (इंग्रजी) सादर करण्यात आले. आर्य वंशाचे रक्षण करायचे असल्याने पंडुपुत्र भीम हा घटोत्कचाचा जन्म होताच आपले साम्राज्य सांभाळण्यासाठी नाइलाजाने पत्नीपत्‍नी आणि मुलापासून दूर जातो. २५ वर्षांनंतर पिता- पुत्रांची भेट होते आणि घटोत्कच आतापर्यंत सतावणारे प्रश्‍न त्याच्यासमोर मांडतो. आई आणि पित्याने समजावल्यानंतर त्याच्या मनातील सर्वच प्रश्‍नांचे समाधान होते आणि भीमसेन घटोत्कचाला युद्धासाठी सज्ज व्हायला सांगतो.
 
मराठवाड्यातील एका खेड्यापासून सुरू झालेला वामन केंद्रे यांचा प्रवास राष्ट्रीय स्तरावरील एकमेव नाट्यप्रशिक्षण शाळेपर्यंत, म्हणजे ‘एनएसडी’च्या संचालकपदापर्यंत पोहोचला आहे. नाटक शिकून ही कला पुढे नेणे, ही त्यांची तळमळ होती. या दुर्दम्य इच्छाशक्तीवरच त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळवला. आज त्याच संस्थेच्या संचालकपदावर ते विराजमान झाले आहेत. पाच वर्षांसाठी ही जबाबदारी पेलताना त्यांच्या योजना आणि संकल्पांबाबत ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधी नम्रता भिंगार्डे यांनी वामन केंद्रे यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या..
मराठवाड्यातील एका खेड्यापासून सुरू झालेला वामन केंद्रे यांचा प्रवास राष्ट्रीय स्तरावरील एकमेव नाट्यप्रशिक्षण शाळेपर्यंत, म्हणजे ‘एनएसडी’च्या संचालकपदापर्यंत पोहोचला आहे. नाटक शिकून ही कला पुढे नेणे, ही त्यांची तळमळ होती. या दुर्दम्य इच्छाशक्तीवरच त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये विद्यार्थी म्हणून प्रवेश मिळवला. आज त्याच संस्थेच्या संचालकपदावर ते विराजमान झाले आहेत. पाच वर्षांसाठी ही जबाबदारी पेलताना त्यांच्या योजना आणि संकल्पांबाबत ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधी नम्रता भिंगार्डे यांनी वामन केंद्रे यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या..0 ‘एनएसडी डायरेक्टर वामन केंद्रे’ अशी पाटी तयार झाली असेल एव्हाना. आता पाच वर्षांचा सत्ताकाळ कसा घालवण्याचा विचार आहे? त्या संस्थेत ‘नॅशनल’ नावाचा शब्द फार महत्त्वाचा आहे. ती राष्ट्रीय स्तरावरची एकमेव नाट्यप्रशिक्षण शाळा आहे. मात्र, तिला खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्तरावर नेण्याची गरज आहे. कारण शहरांत, गावागावांत विविध कलाकृतींना जन्म देणार्‍या कलावंतांमध्ये एनएसडी ‘माझी’ आहे, ही भावना निर्माण करण्याची फार मोठी गरज आहे. त्यासाठी मुळात एनएसडीच्या ॲक्टिव्हिटीजचा परिणाम सर्वदूर पसरावा लागतो. कोणतीही नाट्यशाळा रंगकर्मीला दिशा देण्याचे काम करीत असते. धडपडणाऱ्या सर्वांनाच ती ‘आयडियल’ नाटक म्हणजे काय हे दाखवण्याचे आणि त्याद्वारे शिक्षण देत असते. त्याची सौंदर्यात्मक अनुभूती समजावण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर विविध शैली हाताळून आपल्याला नाटक कसे करता येईल त्याचे दिशादर्शन करत असते. आजच्या प्रवाहातील नाट्यकलाकृतींकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देत असते. थोडक्यात, एनएसडी स्वत:च्या विद्यार्थ्यांना शिकवतेच, पण परिसरातल्या रंगकर्मींवरही ती परिणाम करते. असा परिणाम राष्ट्रीय स्तरावर साधण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली आहे. नाट्यक्षेत्रात कोणकोणते प्रकल्प राबवण्याची गरज वाटते? नाटक एक चळवळ म्हणून आकाराला येत होते तेव्हा एनएसडीची स्थापना झाली. नंतर परिस्थितीनुसार नाटकाचे उद्दिष्टही बदलत गेले. मात्र, ‘एनएसडी’ने ती चळवळ कायमस्वरूपी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवली. ती चळवळ पुढे चालवणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येक प्रकारातील रंगमंचीय अवस्थांना या संस्थेशी कसे जोडता येईल, म्हणजे केवळ थिएटरवाल्यांबरोबरच नाही तर समाजाबरोबरही कसे जोडता येईल याचे विचार माझ्या मनात सुरू झाले आहेत. यासाठी ‘एनएसडी’चे विकेंद्रीकरण करावे लागेल. ही संस्था उदयाला आली तेव्हा ज्या उद्देशाने सर्व राज्यांतील कला एका छत्राखाली आणण्याचे प्रयत्न झाले, तसे प्रत्येक राज्यात झाले पाहिजेत. सध्या रंगभूमी, टेलिव्हिजन, चित्रपट या माध्यमांमुळे कला क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या विलक्षण वाढून एक चळवळ उभी राहिली आहे. त्यात हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे सर्वदूर राष्ट्रीय प्रशिक्षण शाळेचा प्रभाव पाडण्यासाठी या संस्थेमार्फत आपल्याला काय करता येईल, हे पाहण्याची गरज आहे. रिजनल ड्रामा स्कूल स्थापून त्या त्या भाषेत त्या त्या कलाकृतींना अधिक शिक्षित केले पाहिजे. 0 एनएसडीच्या विद्यार्थ्यांना मराठी कलाकारांविषयी खोलवर माहिती व्हावी यासाठी काय करणार? नाट्यकलेत ज्याला पारंगत व्हायचे आहे त्याला सर्व रंगकर्मी, मग ते कोणत्याही भाषेचे असोत, माहीत असतात. अनेकदा बंगाली, नॉर्थ, साऊथच्या कलाकारांचा तिथल्या विद्यार्थ्यांवर पगडा असतो, असे काही पासआऊट विद्यार्थी बोलतात, पण ते खरे नाही. ज्या रंगभूमीच्या संस्कृतीकडून उभ्या देशाने धडे घ्यावेत, अशा मराठी रंगभूमीचा सुवास मी घेऊन तिथे जात आहे. तेव्हा मराठी कलाकारांचे मोठेपण तिथल्या विद्यार्थ्यांना समजावणे हे माझे कामच आहे. परंतु एकाच संस्कृतीतला कुरवाळत बसलो तर राष्ट्रीय शाळा मला चालवता येणार नाही. देशातील प्रत्येक संस्कृतीच्या मृदगंधाचा सहवास विद्यार्थ्यांना मिळेल असे प्रयत्न मी करणार आहे. या सर्व संस्कृतींचे संचित आणि आधुनिक नाट्यचळवळीचे धागेदोरे घेऊन नाटक उभे राहील तेव्हा ते केवळ एका संस्कृतीचे नाही, तर भारतीय नाटक ठरेल. जगातील नाटक मुलांना शिकवणंही तितकच महत्त्वाचे आहे. पारंपरिक आणि आधुनिक गोष्टींना एकत्र करून समाजाशी कनेक्ट करणारी नाट्यप्रशिक्षणाची शाळा प्रत्येकाला कशी उपलब्ध करून देता येईल, याबद्दल विचार करण्याची गरज मला वाटते. 0 या संस्थेतली नाटके म्हणजे केवळ ‘क्लासेससाठीच असा एक समज पसरला आहे. क्लासेस आणि मासेस यातील दरी दूर कशी करणार? एनएसडीत होणारी नाटके बहुतांशी एका प्रेरणेतून, विचारधारेतून आणि एका संस्कृतीतून आलेली असतात. त्यामुळे बरीच नाटके क्लासेससाठीचा अदृश्य बोर्ड घेऊनच येतात. मात्र, आम्ही नाटक सर्वच प्रेक्षकांसाठी बनवतो. त्यामुळे क्लासेस आणि मासेसचा हा पुसटसा गैरसमज दूर करून एका नव्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्यास मी सुरुवात करणार आहे. शेवटी नाटक घेऊन आपल्याला समाजापुढे जायचे आहे. समाजाच्या विवंचना, दु:खे, आनंद समजला नाही, तर नाटक कशाच्या बळावर करणार आहोत? 0 मराठी लोकसंस्कृतीवर तुमची पकड आहे. एनएसडीत सर्व भाषांतील राज्यांतील कलाप्रकारांची सांगड कशी घालणार? संस्कृतींचा भेद करण्यापेक्षा भारतीय आणि पाश्चात्य असे वर्गीकरण करू या. संस्कृतींची सांगड घालता येणे हाच मुळात कोणत्याही कलेचा गाभा असतो. जगातलं नाटक शिकवणं हा त्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आपले आणि जगातले उत्तम शिकवण्याचे काम या शाळेतून आम्ही करू. विद्यार्थी शिकून आपापल्या पद्धतीने त्यांची सांगड घालतो, याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्याचसाठी जर प्रत्येक राज्यात एनएसडीची शाखा स्थापन होऊ शकली, तर प्रत्येक कलाकार प्रशिक्षणाच्या छायेखाली येईल आणि सांस्कृतिकदृष्ट्या आपण आणखी प्रगती करू शकू. कोणकोणत्या मुद्दय़ांवर ठळकपणे कृती करणार? एखाद्या मुलाला नाट्याचे अँडव्हान्स प्रशिक्षण घेण्याची इच्छा झाली, तर आपल्या देशात ती सोय नाही. त्यामुळे एनएसडीला स्पेशलाइज्ड एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर बनवण्याची गरज आहे आणि तो प्रकल्पही डोक्यात आहे. आता जे विषय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकवले जातात त्याव्यतिरिक्त वेगळे विषय शिक्षणात आणणे गरजेचे आहे. म्हणजेच नाट्यलेखन मराठी, बंगाली अशा नाट्यसंस्कृतीत आहे, मात्र इतर भाषांमध्ये ती परंपराच नाही. त्यामुळे नवीन नाटक लिहिण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. नाटक शिकवणे हीसुद्धा एक कला आहे. तेव्हा नाटक शिकवणार्‍यांसाठीही एखादे खास सेशन घ्यावे लागेल. कला प्रशासनाविषयीही विचार झालेला नाही. ज्याप्रमाणे आयएएस अधिकार्‍याला प्रशासन शिकवले जाते, तसेच संबंधित अधिकार्‍याला कलेच्या प्रशासनाचे धडे देता येतील, अशी सोय करण्याचाही विचार सुरू आहे. एखादा विद्यार्थी एनएसडीमधून पास होऊन जगाच्या प्रयोगशाळेत गेला की, तो कोणत्याही माध्यमात लीलया काम करू शकेल, असे कौशल्य त्याच्यात आणता यावे या दृष्टीनेही मी प्रयत्न करणार आहे. 0 एनएसडीचा विद्यार्थी ते एनएसडीचा संचालक प्रवास थरारक आहे? मी जेव्हा एनएसडीत विद्यार्थी होतो तेव्हा बी. व्ही. कारन्थ हे माझे गुरू होते. इब्राहम अल्काझी यांचाही सहवास मला मिळाला. तेव्हा विद्यार्थी म्हणून जेव्हा एनएसडीत वावरलो तेव्हा मी बुजरा होतो. रंगमंचावरील अपार निष्ठा आणि नवीन काही शिकण्याची ओढ या एवढय़ाच भांडवलावर मी तिथे गेलो होतो. आज या नामवंत संस्थेच्या संचालकपदी पोहोचल्यावर तिथे वावरताना पहिल्यासारखा बुजरेपणा निश्चितच नसेल, परंतु नवीन शिकण्याची ओढ मात्र तशीच राहील.
 
प्रश्न : ‘एनएसडी डायरेक्टर वामन केंद्रे’ अशी पाटी तयार झाली असेल एव्हाना. आता पाच वर्षांचा सत्ताकाळ कसा घालवण्याचा विचार आहे? उत्तर : त्या संस्थेत ‘नॅशनल’ नावाचा शब्द फार महत्त्वाचा आहे. ती राष्ट्रीय स्तरावरची एकमेव नाट्यप्रशिक्षण शाळा आहे. मात्र, तिला खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्तरावर नेण्याची गरज आहे. कारण शहरांत, गावागावांत विविध कलाकृतींना जन्म देणार्‍या कलावंतांमध्ये एनएसडी ‘माझी’ आहे, ही भावना निर्माण करण्याची फार मोठी गरज आहे. त्यासाठी मुळात एनएसडीच्या अॅक्टिव्हिटीजचा परिणाम सर्वदूर पसरावा लागतो. कोणतीही नाट्यशाळा रंगकर्मीला दिशा देण्याचे काम करीत असते. धडपडणाऱ्या सर्वांनाच ती ‘आयडियल’ नाटक म्हणजे काय हे दाखवण्याचे आणि त्याद्वारे शिक्षण देत असते. त्याची सौंदर्यात्मक अनुभूती समजावण्याचा प्रयत्‍न करत असते. त्याचबरोबर विविध शैली हाताळून आपल्याला नाटक कसे करता येईल त्याचे दिशादर्शन करत असते. आजच्या प्रवाहातील नाट्यकलाकृतींकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देत असते. थोडक्यात, एनएसडी स्वत:च्या विद्यार्थ्यांना शिकवतेच, पण परिसरातल्या रंगकर्मींवरही ती परिणाम करते. असा परिणाम राष्ट्रीय स्तरावर साधण्याची जबाबदारी आता माझ्यावर आली आहे.
 
प्रश्न : नाट्यक्षेत्रात कोणकोणते प्रकल्प राबवण्याची गरज वाटते? उत्तर : नाटक एक चळवळ म्हणून आकाराला येत होते तेव्हा एनएसडीची स्थापना झाली. नंतर परिस्थितीनुसार नाटकाचे उद्दिष्टही बदलत गेले. मात्र, ‘एनएसडी’ने ती चळवळ कायमस्वरूपी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवली. ती चळवळ पुढे चालवणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येक प्रकारातील रंगमंचीय अवस्थांना या संस्थेशी कसे जोडता येईल, म्हणजे केवळ थिएटरवाल्यांबरोबरच नाही तर समाजाबरोबरही कसे जोडता येईल याचे विचार माझ्या मनात सुरू झाले आहेत. यासाठी ‘एनएसडी’चे विकेंद्रीकरण करावे लागेल. ही संस्था उदयाला आली तेव्हा ज्या उद्देशाने सर्व राज्यांतील कला एका छत्राखाली आणण्याचे प्रयत्‍न झाले, तसे प्रत्येक राज्यात झाले पाहिजेत. सध्या रंगभूमी, टेलिव्हिजन, चित्रपट या माध्यमांमुळे कला क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या विलक्षण वाढून एक चळवळ उभी राहिली आहे. त्यात हजारो लोकांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे सर्वदूर राष्ट्रीय प्रशिक्षण शाळेचा प्रभाव पाडण्यासाठी या संस्थेमार्फत आपल्याला काय करता येईल, हे पाहण्याची गरज आहे. रिजनल ड्रामा स्कूल स्थापून त्या त्या भाषेत त्या त्या कलाकृतींना अधिक शिक्षित केले पाहिजे.
 
प्रश्न : एनएसडीच्या विद्यार्थ्यांना मराठी कलाकारांविषयी खोलवर माहिती व्हावी यासाठी काय करणार? उत्तर : नाट्यकलेत ज्याला पारंगत व्हायचे आहे त्याला सर्व रंगकर्मी, मग ते कोणत्याही भाषेचे असोत, माहीत असतात. अनेकदा बंगाली, नॉर्थ, साऊथच्या कलाकारांचा तिथल्या विद्यार्थ्यांवर पगडा असतो, असे काही पासआऊट विद्यार्थी बोलतात, पण ते खरे नाही. ज्या रंगभूमीच्या संस्कृतीकडून उभ्या देशाने धडे घ्यावेत, अशा मराठी रंगभूमीचा सुवास मी घेऊन तिथे जात आहे. तेव्हा मराठी कलाकारांचे मोठेपण तिथल्या विद्यार्थ्यांना समजावणे हे माझे कामच आहे. परंतु एकाच संस्कृतीतला कुरवाळत बसलो तर राष्ट्रीय शाळा मला चालवता येणार नाही. देशातील प्रत्येक संस्कृतीच्या मृदगंधाचा सहवास विद्यार्थ्यांना मिळेल असे प्रयत्‍न मी करणार आहे. या सर्व संस्कृतींचे संचित आणि आधुनिक नाट्यचळवळीचे धागेदोरे घेऊन नाटक उभे राहील तेव्हा ते केवळ एका संस्कृतीचे नाही, तर भारतीय नाटक ठरेल. जगातील नाटक मुलांना शिकवणंही तितकेच महत्त्वाचे आहे. पारंपरिक आणि आधुनिक गोष्टींना एकत्र करून समाजाशी कनेक्ट करणारी नाट्यप्रशिक्षणाची शाळा प्रत्येकाला कशी उपलब्ध करून देता येईल, याबद्दल विचार करण्याची गरज मला वाटते.
 
प्रश्न : या संस्थेतली नाटके म्हणजे केवळ ‘क्लासेससाठीच असा एक समज पसरला आहे. क्लासेस आणि मासेस यातील दरी दूर कशी करणार? उत्तर : एनएसडीत होणारी नाटके बहुतांशी एका प्रेरणेतून, विचारधारेतून आणि एका संस्कृतीतून आलेली असतात. त्यामुळे बरीच नाटके क्लासेससाठीचा अदृश्य बोर्ड घेऊनच येतात. मात्र, आम्ही नाटक सर्वच प्रेक्षकांसाठी बनवतो. त्यामुळे क्लासेस आणि मासेसचा हा पुसटसा गैरसमज दूर करून एका नव्या पद्धतीने विद्यार्थी घडवण्यास मी सुरुवात करणार आहे. शेवटी नाटक घेऊन आपल्याला समाजापुढे जायचे आहे. समाजाच्या विवंचना, दु:खे, आनंद समजला नाही, तर नाटक कशाच्या बळावर करणार आहोत?
 
प्रश्न : मराठी लोकसंस्कृतीवर तुमची पकड आहे. एनएसडीत सर्व भाषांतील राज्यांतील कलाप्रकारांची सांगड कशी घालणार? उत्तर : संस्कृतींचा भेद करण्यापेक्षा भारतीय आणि पाश्चात्य असे वर्गीकरण करू या. संस्कृतींची सांगड घालता येणे हाच मुळात कोणत्याही कलेचा गाभा असतो. जगातलं नाटक शिकवणं हा त्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. आपले आणि जगातले उत्तम शिकवण्याचे काम या शाळेतून आम्ही करू. विद्यार्थी शिकून आपापल्या पद्धतीने त्यांची सांगड घालतो, याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्याचसाठी जर प्रत्येक राज्यात एनएसडीची शाखा स्थापन होऊ शकली, तर प्रत्येक कलाकार प्रशिक्षणाच्या छायेखाली येईल आणि सांस्कृतिकदृष्ट्या आपण आणखी प्रगती करू शकू.
 
प्रश्न: कोणकोणत्या मुद्दय़ांवर ठळकपणे कृती करणार? उत्तर : एखाद्या मुलाला नाट्याचे अँडव्हान्स्ड प्रशिक्षण घेण्याची इच्छा झाली, तर आपल्या देशात ती सोय नाही. त्यामुळे एनएसडीला स्पेशलाइज्ड एज्युकेशन ट्रेनिंग सेंटर बनवण्याची गरज आहे आणि तो प्रकल्पही डोक्यात आहे. आता जे विषय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकवले जातात त्याव्यतिरिक्त वेगळे विषय शिक्षणात आणणे गरजेचे आहे. म्हणजेच नाट्यलेखन मराठी, बंगाली अशा नाट्यसंस्कृतीत आहे, मात्र इतर भाषांमध्ये ती परंपराच नाही. त्यामुळे नवीन नाटक लिहिण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. नाटक शिकवणे हीसुद्धा एक कला आहे. तेव्हा नाटक शिकवणार्‍यांसाठीही एखादे खास सेशन घ्यावे लागेल. कला प्रशासनाविषयीही विचार झालेला नाही. ज्याप्रमाणे आयएएस अधिकार्‍याला प्रशासन शिकवले जाते, तसेच संबंधित अधिकार्‍याला कलेच्या प्रशासनाचे धडे देता येतील, अशी सोय करण्याचाही विचार सुरू आहे. एखादा विद्यार्थी एनएसडीमधून पास होऊन जगाच्या प्रयोगशाळेत गेला की, तो कोणत्याही माध्यमात लीलया काम करू शकेल, असे कौशल्य त्याच्यात आणता यावे या दृष्टीनेही मी प्रयत्‍न करणार आहे.
 
प्रश्न : एनएसडीचा विद्यार्थी ते एनएसडीचा संचालक प्रवास थरारक आहे? उत्तर : मी जेव्हा एनएसडीत विद्यार्थी होतो तेव्हा बी. व्ही. कारंथ हे माझे गुरू होते. इब्राहिम अल्काझी यांचाही सहवास मला मिळाला. तेव्हा विद्यार्थी म्हणून जेव्हा एनएसडीत वावरलो तेव्हा मी बुजरा होतो. रंगमंचावरील अपार निष्ठा आणि नवीन काही शिकण्याची ओढ या एवढय़ाच भांडवलावर मी तिथे गेलो होतो. आज या नामवंत संस्थेच्या संचालकपदी पोहोचल्यावर तिथे वावरताना पहिल्यासारखा बुजरेपणा निश्चितच नसेल, परंतु नवीन शिकण्याची ओढ मात्र तशीच राहील.
 
==वामन केंद्रे यांना दिग्दर्शित केलेली नाटके==