"बाळ कर्वे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
दुवे, बांधणी
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बाळ कर्वे''' ([[ऑगस्ट २५|२५ ऑगस्ट]], [[इ.स. १९३०|१९३०]]) हे मराठी नाट्य आणि चित्रपटअभिनेते आहेत. यांनी केलेली दूरदर्शनवर चिमणराव-गुंड्याभाऊ मालिकेत केलेली [[गुंड्याभाऊ|गुंड्याभाऊची]] भूमिका खूप प्रसिद्ध झाली.
 
बाळ कर्वे हे [[बृहन्मुंबई महानगरपालिका|मुंबई महानगरपालिकेत]] स्थापत्य अभियंता म्हणून नोकरीला होते. त्यांनी बत्तीस वर्षे नोकरी केली. नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत पार्ल्यात एका नातेवाइकाकडे राहात.. त्याच ‌इमारतीत सुमंत वरणगांवकर राहायचे. ते रंगभूमीशी संबंधित होते. नाटकाची आवड असल्यामुळे त्यांची मैत्री झाली आणि दोघांनी मिळून ‘किलबिल बालरंगमंच’ अशी छोटीशी संस्था स्थापन केलीआणि त्तिच्यासाठी ते बालनाट्ये बसवू लागले.
 
'चिमणराव-गुंड्याभाऊ' ही भारतातील पहिली टीव्ही मालिका होती. तोपर्यंत टीव्हीवर मालिकांचा सिलसिला सुरू झालेला नव्हता. याकूब सईद आणि विजया जोगळेकर यांची ती संकल्पना होती. गुंड्याभाऊच्या भूमिकेसाठी शरद तळवलकरचे नाव सुचविले होते, पण ते तेव्हा चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी कर्व्यांचे नाव सुचविले आणि अपघातानेच वाट्याला आलेल्या त्या भूमिकेने बाळ कर्वे महाराष्ट्रातल्या घराघरात आणि मनामनांत पोहोचले.
 
==नाटके==
* अजब न्याय वर्तुळाचा
* चिमणराव-गुंड्याभाऊ (दूरचित्रवाणी मालिका)
* सूर्याची पिल्ले
* संध्याछाया (पहिले व्यावसायिक नाटक)
 
==चित्रपट==
* गोडी गुलाबी (१९९१)
* चटक चांदणी (१९८२)
* लपंडाव (१९९३)
 
 
==आत्मचरित्र==
बाळ कर्व्याचे ‘मी गुंड्याभाऊ’ हे आत्मचरित्र आहे, ते [[मंदा खांडगे]] यांनी शब्दबद्ध केले आहे.
 
 
==पुरस्कार==
बाळ कर्वे यांना गुंड्याभाऊच्या भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचे दोन पुरस्कार मिळाले.
"https://mr.wikipedia.org/wiki/बाळ_कर्वे" पासून हुडकले