"डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुण्यातील डेक्कन कॉलेजात मराठा ऐतिहासक संग्रहालय आणि पुरातत्...
(काही फरक नाही)

०६:४१, २२ मे २०१६ ची आवृत्ती

पुण्यातील डेक्कन कॉलेजात मराठा ऐतिहासक संग्रहालय आणि पुरातत्त्व संग्रहालय अशी दोन संग्रहालये आहेत.

पुरतत्त्व संग्रहालयात मानवाच्या सांस्कृतिक इतिहासाचे टप्पे दाखवणार्‍या लोहयुगातील वस्तू, भारतीय कलावस्तू, नाणी, पुराभिलेख आदी गोष्टी आहेत. संग्रहालय पाहताना मानवाच्या प्रारंभापासून ते प्रगत अवस्थेपर्यंतचा परिचय विविध्स्वरूपाच्या अवशेषांपासून आयुधांतून व अलंकारांतून होतो. पाषाणयुग, लोहयुग, ताम्रपाषाणयुग, शिल्पकला, नाणकशास्त्र, वांशिक पुरातत्त्व आदींशी संबंधित वस्तू येथे पहावयास मिळतात. प्रा. हंसमुख धीरजलाल सांकलिया यांच्या स्मरणार्थ एक स्वतंत्र कक्षही या संग्रहालयात आहे.