"दत्तात्रेय राईलकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: दत्तात्रेय विनायक तथा गजाननबुवा राईलकर (जन्म : इ.स. १९२१; मृत्यू : १...
(काही फरक नाही)

१२:०४, १९ मे २०१६ ची आवृत्ती

दत्तात्रेय विनायक तथा गजाननबुवा राईलकर (जन्म : इ.स. १९२१; मृत्यू : १७ मे, इ.स. २०१६) हे एक मराठी कीर्तनकार होते.

राईलकरबुवा यांनी ज्येष्ठ कीर्तनकार रामचंद्रबुवा शिरवळकर यांच्याकडे बालवयातच गुरुकुल पद्धतीने कीर्तनाचे शिक्षण घेतले. आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या राईलकर यांनी वयाच्या १२व्या वर्षी कीर्तनासाठी झांज हातामध्ये घेतली. कीर्तनकाराला शोभेसे देखणे रूप, खणखणीत आवाज आणि गायनाची उत्तम तयारी, वेदान्त-पुराणे आणि इतिहासाचा चांगला अभ्यास त्यामुळे परिपूर्ण कीर्तनकार अशीच राईलकरबुवांची ख्याती होती. रामदासी आणि नारदीय कीर्तन करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. पुणे आकाशवाणी केंद्र आणि मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यानंतर पहिले कीर्तन करण्याचा बहुमान राईलकर बुवांना लाभला होता.

महाराष्ट्राप्रमाणेच देशभर फिरून त्यांनी कीर्तन केले. श्री हरिकीर्तनोत्तेजक सभा या कीर्तन परंपरा जतन करण्यासाठी कार्यरत असलेल्या संस्थेमध्ये विविध पदांवर त्यांनी काम केले. या संस्थेचे ते दीर्घकाळ अध्यक्षही होते. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे राईलकर यांना कमलाकरबुवा औरंगाबादकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कीर्तन सार्वभौम, कीर्तन केसरी, अशा विविध पदव्या त्यांना मिळाल्या होत्या. महाराष्ट्र सरकारतर्फे २८ फेब्रुवारी २०१३ रोजी एक लाख रुपयांचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता.