"मंगेश पाडगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १७९:
 
==मंगेशकरांचे काव्यवाचन==
साहि्त्य संमेलनांत कवि संमेलने होतात, होळी, दसरा, पाडवा अशा सणांच्या निमित्तानेही होतात. एरवीही सभेच्या निमित्ताने चार माणसे जमली की एखादा कवी कार्यक्रमाच्या आधीमधी आपल्या कविता ऐकवतो. परंतु केवळ कविता वाचनासाठी आमंत्रित केले जाणारे नारायण सुर्वे, नांदगावकर, बा. . बोरकर, अनिल, इंदिरा संत, संजीवनी असे कवी तसे कमीच. पाडगावकरांना मात्र आमंत्रणांची कधीही ददात पडली नाही.
 
काव्यवाचनासाठी महाराष्ट्राचा दौरा करणारे कवी तर अतिशय विरळा. मंगेश पाडगावकर हे असे विरळा कवींपैकी होते.
ओळ १८६:
 
इ.स. १९९०च्या दशकानंतर मात्र उतारवयामुळे तिघांनीही कार्यक्रम कमी केले आणि नंतर या त्रयीतले एकेक जण गळायला लागले. आधी वसंत बापट गेले, नंतर विंदांनी निरोप घेतला आणि शेवटी 'या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे' म्हणणा‍रे मंगेश पाडगावकरही गेले. मात्र बापट-पाडगावकर-करंदीकर कुणीही नसलं, तरी त्यांनी रुजवलेली काव्यवाचनाची गोडी मात्र मराठी मनांमनांत झिरपली आहे.
 
==प्रत्येकाची वेगळी शैली==
बापट-पाडगावकर-करंदीकर या त्रिकुटाने १९५३पासून आपल्या कवितांचे एकत्र वाचन करण्याची प्रथा पाडली आणि स्वतःची अशी स्वतंत्र शैलीही निर्माण केली. काव्यवाचनात या तिघांनी मारलेली बाजी बघून नंतरनंतर आयोजकच या तिघांना एकत्रितपणे बोलवायला लागले आणि काव्यवाचनाची एक वेगळी परंपराच महाराष्ट्रात रुजली. या तिघांनी एकत्र काव्यवाचन करण्याच्या या कल्पनेला 'पॉप्युलर प्रकाशन'च्या 'काव्यदर्शन' या उपक्रमाने अधिक बळ दिले. या उपक्रमाच्या पूर्वार्धात बापट-पाडगावकर-करंदीकर हे तिघेही केशवसुत-बालकवी अशा आपल्या पूर्वसुरींच्या कविता वाचायचे; तर उत्तरार्धात स्वतःच्या निवडक कविता वाचायचे. हा कार्यक्रमही लोकांनी डोक्यावर घेतला. त्यातून या कार्यक्रमाचे अनेक प्रयोग करायचे असे ठरले. परंतु तिघांच्या वेळांची जुळवाजुळव करताना तिरपीट व्हायची. त्यात करंदीकर काही वर्षांसाठी परदेशात गेले आणि हा उपक्रम बंदच पडला. मात्र करंदीकर परत आल्यावर तिघांच्या एकत्रित काव्यवाचनाच्या कल्पनेने पुन्हा उचल घेतली. मात्र यावेळी फक्त स्वतःच्याच कविता वाचायच्या, असं नक्की करण्यात आले. त्यानंतर बापट-पाडगावकर-करंदीकर त्रयीचा काव्यवाचनाचा वारू मराठी मातीत तब्बल चाळीस-पन्नास वर्षं दौडत राहिला, तो एकेक्जण गळेपर्यंत.
 
==पैसे मोजून काव्यश्रवण==
बापट-पाडगावकर-करंदीकर या तिघांच्याही काव्याचे रूप एकमेकांपेक्षा वेगळे होते. वसंत बापटांची कविता संस्कृतप्रचुर आणि रोमॅन्टिक होती, पाडगावकरांची कविता भावकविता होती, तर विंदांची कविता या दोघांपेक्षा वेगळी, म्हणजे केंद्रस्थानी माणूस असलेली वास्तववादी होती. परंतु वेगळ्या धाटणीच्या तीन शैली एकत्र ऐकायला मिळत असल्यामुळे रसिक त्यांच्या काव्यवाचनाला आवर्जून हजेरी लावायचे. त्यांच्या या काव्यवाचनाच्या यशाचे गमक त्यांच्या काव्यवाचनाच्या शैलीतही होते. वसंत बापटांचा आवाज काहीसा पिचका होता. पण त्यांच्यात नट दडलेला असल्यामुळे 'सुपारी' किंवा 'अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ'सारख्या कविता ते म्हणायचे, तेव्हा रसिकांसमोर ती कविता दृश्यमान व्हायची. विंदांचा आवाज त्यांच्या कवितेसारखाच टोकदार होता; त्यामुळे त्या आवाजात 'धोंड्या न्हावी' किंवा 'ती जनता अमर आहे'सारखी कविता ऐकताना एकदम भारुन जायला व्हायचे. तर कवितावाचन करताना मंगेश पाडगावकर एकदम खर्जातला आवाज लावायचे. या आवाजात 'सलाम' किंवा 'एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून'सारख्या कविता म्हणताना त्यांचा एकदम आश्वासक सूर लागायचा. या वैशिष्ट्यांमुळेच या त्रयीने मराठी र‌सिकांवर अक्षरशः अधिराज्य गाजवले. विशेष म्हणजे पैसे मोजून घेऊन मग आपली कविता ऐकवायची सवय या तिघांनीच महाराष्ट्राला लावली.
 
== गौरव ==