"रस्किन बाँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ ३२:
{{विस्तार}}
 
रस्किन बाँड (जन्म : कसौली-हिमाचल प्रदेश-भारत. १९ मे, इ.स. १९३४) हे इंग्रजीतून मुख्यतः मुलांसाठी लिखाण करणारे एक भारतीय बालकथाकार लेखक आहेत. ते उत्तराखंडच्या डेहराडून या नयनरम्य शहरात राहतात. बाँड यांनी कथा, ललित लेखन, कादंबर्‍या, पर्यावरण व निसर्ग याबद्दलचे लिखाण मुबलक स्वरूपात केले. त्यांची आजवर छोटी-मोठी ५००हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
 
कसौलीच्या मिलिटरी हॉस्पिटलामध्ये एडिथ क्लार्क आणि ऑब्रे अलेक्झांडर बाँड यांच्या पोटी जन्मलेल्या रस्किन ऊर्फ रस्टी याचे बालपण जामनगर, देहराडून आणि सिमल्यामध्ये गेले. छोटा रस्टी काहीसा अबोल, अंतर्मुख वृत्तीचा होता. आई-वडील विभक्त झाले होते. आई लहानपणीच घर सोडून गेल्याने असेल, पण तो आणि त्याचे वडील मनाने खूप जवळ होते. वडील निसर्गप्रेमी होते आणि रस्टीला घेऊन ते हिमालयातल्या वाटांवर खूप भटकंती करत. मोकळ्या जागांवर, तोड झालेल्या जंगलातल्या रिकाम्या पट्ट्यांवर झाडे लावत.
 
रस्किन लहानपणी पुस्तकेही भरपूर वाचायचा. वडिलांनी त्याच्या एका वाढदिवसाला त्याला एक गवतफुलाचे चित्र असणारी डायरी भेट दिली. आईवाचून एकाकी वाढणार्‍या रस्टीच्या मनात भावनांची असंख्य आंदोलने उसळत असणार, हे त्यांनी ओळखले होते. त्याचा निचरा सर्जनाद्वारे व्हावा हा एक हेतू डायरी देण्यामागे होताच. रस्किनने त्यात आजूबाजूचा निसर्ग, त्याला भेटणारे लोक, रोजचा घालवलेला दिवस यांच्या नोंदी करून ठेवायला सुरुवात केली. वडील त्यानंतर लगेचच मलेरियाने वारले. मग आपल्या आई, आजीसोबत, वसतीगृहात अशी रस्टीच्या आयुष्यातली वर्षे जात राहिली. पण या सर्व काळात तो फक्त निसर्गात आणि त्याच्या डायरीतल्या नोंदींमध्ये रमला. आपल्या सोबतच्या दोस्तांना तो डायरीत लिहिलेले वाचून दाखवे आणि ते आग्रह करीत, तेव्हा त्यांच्यावरही लिहीत असे.
 
==रस्किन बाँड यांची पुस्तके==
Line ४४ ⟶ ४८:
* Immortal Stories
* Indian Railway Stories
* Love among the bookshelves
* Nature Omnibus - A Bond with Nature (तीन पुस्तकांचा संच)
* Night Train at Deoli: And Other Stories
* Notes from a small room
* Panther's Moon.
* Rain in the Mountains
* Road to the Bazaar
* The Room on the Roof (रस्किन बाँडचे पहिले पुस्तक - वयाच्या १७व्या वर्षी लिहिलेले; मराठी अनुवाद - आशा साठे)
* Ruskin's Bond Book of Nature
* Rusty