"शंकर पळशीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शंकर पळशीकर (जन्म: १७मे, इ.स. १९१७) हे एक मराठी चित्रकार होते. १९४२ त...
(काही फरक नाही)

०५:३९, १६ मे २०१६ ची आवृत्ती

शंकर पळशीकर (जन्म: १७मे, इ.स. १९१७) हे एक मराठी चित्रकार होते. १९४२ ते १९४७ ही पाच वर्षे त्यांनी मुंबईच्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलाशिक्षण घेतले. पाचही वर्षं वर्गात प्रथम, आल्यामुळे ते 'मेयो मेडल' ह्या अत्युच्च पारितोषिकाचे मानकरी झाले. शिक्षण पूर्ण होताहोताच ते त्याच संस्थेत कलाशिक्षक झाले.

'जे.जे. स्कूल ऑफ आर्ट'चे पळशीकर हे त्यावेळचे मान्यवर चित्रकार होते आणि त्यांचा कलाक्षेत्रात दबदबा होता. त्यांनी स्कूलमधून बाहेर पडून आपल्यात यावे असे सुझा, रझा, आरा, बाक्रे, हुसेन, गाडे, गायतोंडे इत्यादी अनेक बंडखोर चित्रकारांना वाटत असे. मात्र स्कूल ऑफ आर्ट टिकवून ठेवण्याची नैतिक जबाबदारी पळशीकरांनी स्वतःहूनच आपल्या खांद्यावर घेतली होती.

पळशीकरांनी व्यक्तिचित्रण कलेला अभिव्यक्तीचा दर्जा दिला आणि मॉडेलचे केवळ हुबेहूब चित्रण करण्यात गुंतलेल्या चित्रकारांना त्यांनी व्यक्तिचित्रणातूनच स्वतःकडे, स्वतःच्या शैलीकडे आणि सोबत अभिव्यक्तीकडे येण्यासाठी लागणारे धाडस आणि दृष्टी दिली.

भरपूर प्रसिद्धी, नावलौकिक मिळूनही एका जागी भक्कमपणे स्थिर राहणे आणि गर्दीत वाहून जाणे यातला फरक पळशीकरांनी आजमावला असावा. यशस्वी होऊन थांबणे आणि यश ओलांडून पुढे जाणे, यातला सूक्ष्म फरक त्यांना सजग करून गेला. कलाक्षेत्रात मिळालेले सर्व यश ओलांडून, 'जे जे स्कूल ऑफ आर्ट'मध्ये आपल्याजवळचे कलात्मक सर्वस्व विद्यार्थ्यांना देण्यासाठी शंकर पळशीकर स्कूलमध्येच स्थिर राहिले. कालांतराने सहा वर्ष संस्थेचे डीन पद भूषवून एकूण तेहत्तीस वर्षांच्या शासकीय सेवेनंतर ते निवृत्त झाले.

पळशीकरांच्या हातून उतरलेली 'मिस के', 'सुलभा आनंदकर', 'गायकवाड', 'पौल कोळी' आणि 'कोलते' ह्या जे.जे.शीच निगडित असणाऱ्या व्यक्तींची चित्रणे बेमिसाल अभिव्यक्तीची उदाहरणे ठरली. त्या व्यतिरिक्त त्यांनी केलेली लोकमान्य टिळक, विष्णुदास भावे, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरू इत्यादी अनेक महान व्यक्तींची चित्रणे ही व्यावसायिक कामे असूनही त्यांत पळशीकरांची अभिव्यक्ती जाणवते.

शिष्यवृंद

शंकर पळशीकरांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले. वासुदेव गायतोंडे, प्रभाकर कोलते हे त्यांपैकी काही.

शंकर पळशीकरांना मिळालेले सन्मान

  • मेयो मेडल
  • भारत शासनाची चित्रकाराला मिळालेली सर्वात पहिली प्रवासी शिष्यवृत्ती
  • बॉम्बे आर्ट सोसायटीची दोनवेळा रौप्य आणि एकदा सुवर्णपदक
  • कलकत्ता आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक