"नानासाहेब सरपोतदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
 
नाशिकजवळच्या येवळे गावातील अंबू सगुण नावाची मुलगी मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या आर्यन फिल्म कंपतीत प्रथम ती नायिका झाली व पुढे [[ललिता पवार]] या नावाने लोकप्रिय झाली. [[महाराची पोर]] हा चित्रपट सरपोतदारांनी लिहून दिग्दर्शित केला होता. अंबू ऊर्फ ललिता पवारने महाराजाच्या मुलीची भूमिका केली होती. हा चित्रपट पहायला [[सरोजिनी नायडू]] गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. या चित्रपटाची [[महात्मा गांधी]], [[मौलाना शौकत अली]], [[बॅरिस्टर बाप्टिस्टा]], [[अच्युत बळवंत कोल्हटकर]] आदींनी मुक्तकंठाने प्रशंसा केली होती. मद्रासच्या [[हिंदू (वृत्तपत्र)|हिंदू]], [[जस्टिस (वृत्तपत्र)|जस्टिस]] वृत्तपत्रांनी अग्रलेख लिहून सरपोतदारांचे कौतुक केले होते.
 
==नवोदित कलाकारांना संधी==
नानासाहेब सरपोतदारांनी [[शाहू मोडक]], [[ललिता पवार]], राजा सँडो, [[रत्‍नमाला]], भाऊराव दातार, [[पार्श्वनाथ आळतेकर]], [[डी. बिलिमोरिया]] आदी कलावंतांना चित्रपटांत काम करण्याची पहिली संधी दिली.
 
==मूकपटांची निर्मिती==
Line ११ ⟶ १४:
 
==चित्रपट दिग्दर्शन==
अर्देशीर इराणी यांच्या इंपीरियल कंपनीचा ‘रुक्मिणीहरण’ (१९३३) हा बोलपट नानासाहेबांनी दिग्दर्शित केला. यामध्ये डी. बिलिमोरिया, पंडितराव नगरकर, भाऊराव दातार यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवकी’ या बोलपटात भाऊराव दातार, मिस दुलारी व राजा सॅण्डो होते. १९३८ साली ‘रवींद्र पिक्चर्स’साठी ‘संत जनाबाई’ व ‘सरस्वती सिनेटोन’साठी ‘भगवा झेंडा’ चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
 
==पूना गेस्ट हाऊस==
चित्रपट व्यवसाय हा बिनभरवशाचा धंदा आहे, हे ओळखून नानासाहेबांनी १९३६च्या अनंत चतुर्दशीला लक्ष्मी रोडवरील सामान्यजनांना स्वस्तात पोटभर भोजन मिळावे, म्हणून ‘पूना गेस्ट हाऊस’ उघडून केवळ दोन आण्यांत राइस प्लेट चालू केली. स्वस्त आणि रुचकर अन्नपदार्थ, नानासाहेबांचा बोलका-मिष्कील स्वभाव यामुळे थोडयाच अवधीत ‘पूना गेस्ट हाऊस’ कलावंत आणि साहित्यिकांचे उतरायचे आणि भेटायचे आवडते ठिकाण बनले. नानासाहेबांच्या निधनानंतर पूना गेस्ट हाऊसचा कारभार त्यांचे चिरंजीव चारुदत्त सरपोतदार सांभाळू लागले.
 
==लेखन==
नानासाहेब सरपोतदारांना चांगले साहित्य वाचायची आवड होती. ते लेखकही होते. मौज साप्ताहिकात त्यांनी काही परखड लेख लिहिले होते. नानासाहेबांनी लिहिलेली काही नाटके:- <br/>
* उनाड मैना
* चंद्रराव मोरे
* बाजीरावचा बेटा, वगैरे.’ .
 
==पटकथालेखन असलेले चित्रपट==
Line २२ ⟶ ३१:
* चंद्रराव मोरे (दिग्दर्शन)
* दामाजी (पटकथालेखन)
* देवकी (दिग्दर्शन)
* निमक हराम (आधीचे नाव- हरहर महादेव) (निर्मिती)
* पतितोद्धार (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
* पारिजातक (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
* प्रभावती (मूकपट) (पहिले दिग्दर्शन)
* भगवा झेंडा (दिग्दर्शन)
* भवानी तलवार (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
* भीमसेन (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
Line ३३ ⟶ ४४:
* राजा हरिश्चंद्र (मूकपट, निर्मिती व दिग्दर्शन)
* रायगडचे पतन (दिग्दर्शन)
* रुक्मिणीहरण (दिग्दर्शन)
* वत्सलाहरण (पटकथालेखन)
* शहाला शह (पटकथालेखन)
* संत जनाबाई (दिग्दर्शन)
* सती सावित्री (पटकथालेखन)
* सिंहगड (पटकथालेखन)