"मुकुंद वझे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मुकुंद वझे हे हे एक मराठी लेखक आणि बँक अधिकारी होते. त्‍यांनी 'बँक...
(काही फरक नाही)

२१:३०, ७ मे २०१६ ची आवृत्ती

मुकुंद वझे हे हे एक मराठी लेखक आणि बँक अधिकारी होते. त्‍यांनी 'बँक ऑफ इंडिया'मध्‍ये चाळीस वर्ष काम केले. वझे यांनी वयाच्‍या तेवीसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना त्‍यांना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमाेर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली.

मुकुंद वझे यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या. त्‍यांचे 'महाराष्‍ट्र टाइम्‍स' आणि 'लोकसत्ता' या दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

मुकुंद वझे यांची पुस्तके

  • क्‍लोज्ड सर्किट
  • टिळक ते गांधी मार्गे खाडिलकर
  • शब्‍दसुरांच्‍या पलीकडले
  • शेष काही राहिले