"वाहन विमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ २१:
# अपघातामध्ये समाविष्ट इतर विमा नसलेल्या वाहनचालकांचा वैद्यकीय खर्च
 
विभिन्न विमा पॉलिसी मध्ये वेगवेगळ्या बाबींचा अंतर्भाव असू शकतो.<ref>{{स्रोत बातमी |दुवा=http://www.turtlemint.com/car-insurance |शीर्षक=कार विमा (Car Insurance) - टर्तलमिंटटर्टलमिंट |प्रकाशक=टर्तलमिंट.कॉम |दिनांक=६ मे २०१६| प्राप्त दिनांक=}}</ref> उदा. चोरी, आगीमुळे होणारे नुकसान, व अपघातांमुळे होणारे नुकसान यांसाठी वेगवेगळा वाहन विमा असू शकतो.
 
===विमा करताना===
खासगी व व्यापारी उपयोगाची वाहने यांच्यासाठी विम्याचे दर वेगवेगळे आहेत. विम्याचा अर्ज भरताना "आरटीओ‘च्या नोंदणी प्रमाणपत्रानुसार मालकाचे नाव, गाडीचा नोंदणी क्रमांक, नोंदणी तारीख, इंजिन व चासीज क्रमांक वगैरे काळजीपूर्वक नमूद करावे लागते. वाहनाची अश्‍वशक्ती किंवा क्‍युबिक कपॅसिटी हीसुद्धा महत्त्वाची माहिती असते. नुकसान भरपाईचा दावा केल्यानंतर क्षुल्लक कारणाने दावा फेटाळला जाण्याची शक्‍यता असते, त्यामुळे याबाबत काळजी घेतली पाहिजे.
 
===वाहनाची किंमत ठरविताना===
खासगी तसेच व्यापारी वाहनांचा विमा उतरविताना त्यातील वाहनाच्या नुकसानभरपाईचा भाग मोठ्या जोखमीचा असतो. यामध्ये गाडीच्या किमतीवर विमा हप्ता आकारला जातो. नोंदणी तारखेपासून पुढील पाच वर्षे एक्‍स शोरूम किमतीवर दर वर्षी विशिष्ट घसारा आकारून किंमत ठरते. त्यानंतर ग्राहक व विमा कंपनी यांच्यात परस्परसमजुतीने किंमत (इन्शुअर्ड्‌'ज डिक्‍लेअर्ड व्हॅल्यू) ठरविली जाते. संपूर्ण विमा करताना वाहनाची किंमत अत्यंत महत्त्वाची असते. वाहनाच्या दुरुस्तीचा खर्च वाहनाच्या किमतीच्या विशिष्ट टक्‍क्‍यांच्यावर (उदा. टोटल लॉस) जात असल्यास आधारभूत किमतीवर दावा निकाली निघतो. वाहनाची किंमत निश्‍चित करताना, विमा हप्ता कमी पडावा म्हणून किंमत कमी ठेवल्यास वरील बाबतीत मोठ्या नुकसानीस तोंड द्यावे लागते. गरज वाटल्यास विमा कंपनीच्या व्हॅल्युअरकडून किंमत ठरवून घेता येते. इंजिन किंवा वजनक्षमतेवर विशिष्ट कोष्टकानुसार यात हप्ता आकारला जातो.
 
खासगी वाहनातील कार टेप, एलसीडी आदी मौल्यवान वस्तूंचा वेगळा आकार भरून विमा करावा लागतो. वाहनात एलपीजी, सीएनजी किट बसविलेले असल्यास त्याची किंमत नमूद करून त्याचाही वेगळा आकार भरावा. अशा प्रकारे वेगळा आकार भरून त्या-त्या वस्तूंचे संरक्षण घेणे आवश्‍यक असते.
 
==अतिरिक्त विमा:==
"https://mr.wikipedia.org/wiki/वाहन_विमा" पासून हुडकले