"मराठीतील कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मराठीतील एकंदर कोशांची संख्या अदमासे हजाराच्या घरात जाईल. शब्दकोश, ज्ञानकोश/विश्वकोश, तत्त्वज्ञानकोश, चरित्रकोश, तिथिकोश, संख्यासंकेतकोश, सुविचारकोश, ग्रंथसूची, जंत्री आणि शकावली, निदेशपुस्तके, निर्देशिका, वार्षिके व पंचांगे, भौगोलिक कोश-ग्रामसूची, गॅझेटियर्स असे कोशांचे निरनिराळे प्रकार मराठीत आढळतात.
 
==शब्दकोश==
ओळ २१:
==संस्कृतिकोश==
महादेवशास्त्री जोशी यांनी १९६२ ते १९७९या काळात दहा खंडांचा 'भारतीय संस्कृतिकोश' ही महत्त्वाची कोशनिर्मिती केली.. संस्कृतीचे विविध घटक लक्षात घेऊन केलेल्या सुमारे बारा हजार नोंदी या कोशात आहेत. या कोशाप्रमाणेच दोन हजार पृष्ठांचा, चार खंडांतील मुलांचा संस्कृतिकोशही महादेवशास्त्रींनी निर्माण केला.
 
==तत्त्वज्ञानकोश==
* देवीदास दत्तात्रय वाडेकर यांचा त्रिखंडात्मक 'मराठी तत्त्वज्ञान महाकोश'
* ह.श्री. शेणोलीकर यांचा 'मराठी संत-तत्त्वज्ञान संज्ञा कोश' (१९९४)
 
==चरित्रकोश==
* रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी १८७६ मध्ये रचलेला 'भारतवर्षीय ऐतिहासिक कोश'
* गं.दे. खानोलकररचित 'अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक' (भाग १ ते ७)
* सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा 'भारतवर्षीय प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन चरित्रकोश' खंड १, २ व ३.